India Pakistan War Saam Tv
देश विदेश

India Pakistan War: पाकड्यांची नापाक चाल! दिल्लीवर डागले 'फतेह-२' क्षेपणास्त्र; हल्ल्याचा डाव लष्कराने उधळून लावला

Pak’s Missile Attack on Delhi Foiled: पाकिस्तानने आता राजधानी दिल्लीला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला. दिल्लीच्या दिशेने 'फतेह-२' क्षेपणास्त्र डागले. पण त्यांचा हल्ल्याचा डाव भारताने उधळवून लावला.

Priya More

पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने सुरू केलेल्या ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तान चांगलात हादरला आहे. पाकिस्तानकडून भारतावर सतत ड्रोनद्वारे आणि क्षेपणास्त्राद्वारे हल्ले सुरू आहेत. भारतीय सैन्याकडून पाकिस्तानला सडेतोड प्रत्युत्तर दिले जात आहे. पाकिस्तानने देशाची राजधानी दिल्लीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पण पाकिस्तानच्या हल्ल्याचा प्रयत्न भारतीय सैन्यांनी हाणून पाडला. पाकिस्तानने दिल्लीवर क्षेपणास्त्र डागले होते. पण आपल्या सुरक्षा दलाच्या सतर्कतेमुळे आणि तत्परतेमुळे पाकिस्तानचे हे क्षेपणास्त्र पाडण्यात आले.

पाकिस्तानकडून भारतावर हल्ले सुरूच आहे. पण पाकड्याचे सर्व प्रयत्न अयशस्वी ठरत आहे. भारतीय जवान पाकिस्तानच्या प्रत्येक हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देत आहेत. भारताच्या सैन्यांकडून हवेतच पाकिस्तानचे ड्रोन आणि क्षेपणास्त्रे पाडले जात आहेत. शुक्रवारी रात्री पाकिस्तानने भारतावर फतेह-२ क्षेपणास्त्र डागले होते. या क्षेपणास्त्राद्वारे पाकिस्तानचा दिल्लीवर हल्ला करण्याचा प्रयत्न होता. पण पाकड्यांचे हे क्षेपणास्त्र सैन्यांनी पाडले. हरियाणातील सिरसा येथे हे क्षेपणास्त्र पाडण्यात आले.

९ मे च्या रात्री पाकिस्तानने दिल्लीवर फतेह-२ बॅलिस्टिक क्षेपणास्त्र डागले. भारताच्या हवाई संरक्षण यंत्रणेने हरियाणातील सिरसा येथे ते क्षेपणास्त्र यशस्वीरित्या पाडले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या क्षेपणास्त्राने भारताची राजधानी दिल्लीला लक्ष्य करण्यात आले होते. दिल्ली पूर्णपणे सुरक्षित आहे. पाकिस्तानने केलेल्या या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

सध्या भारत-पाकिस्तान सीमेवर तणाव प्रचंड वाढला आहे. पाकिस्तान वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन करत आहे. भारताच्या दिशेने गोळीबार, ड्रोन हल्ले आणि क्षेपणास्त्र हल्ले सुरूच आहेत. पाकिस्तानकडून होणाऱ्या हल्ल्यामुळे सीमेजवळ असलेल्या सर्व शहरांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. अनेक शहरांमध्ये ब्लॅकआउट लागू करण्यात आले आहे. हवाई हल्ल्याचा इशारा देणारे सायरन वाजत आहेत आणि सार्वजनिक जीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chandrashekhar Bawankule : फोन टॅपिंगनंतर आता मोबाईल सर्व्हिलन्स? बावनकुळेंच्या वक्तव्याने राज्यात खळबळ, VIDEO

Saturday Horoscope : विनाकारण कामांमध्ये येणाऱ्या अडचणीमुळे मनोबल कमी होईल; ५ राशींच्या लोकांना राहावे लागेल सावध

Maharashtra Government : राज्यात बांगलादेशी घुसखोरांना आळा बसणार; फडणवीस सरकारने उचललं मोठं पाऊल

Satara News : डॉक्टर महिलेचे आरोपीसोबत १५० हून अधिक कॉल, आत्महत्येपूर्वी काय घडलं? पोलीस तपासात महत्वाची माहिती समोर

Manoj jarange: मनोज जरांगे पुन्हा मैदानात, शेतकरी संघटनांना जरांगेंची हाक

SCROLL FOR NEXT