पुण्याच्या ग्रामीण भागात कोरोना हॉट-स्पॉट गावांच्या संख्येत वाढ Saam Tv
देश विदेश

India Corona Update: कोरोनाचा धोका कायम! सक्रिय रुग्णांच्या संख्येत वाढ

गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे तब्बल 17,336 नवीन रुग्ण आढळून आले आहेत.

वृत्तसंस्था

नवी दिल्ली - गेल्या काही दिवसांपासून देशभरात कोरोना (Corona) रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. दैनंदिन कोरोनाबाधित रुग्ण वाढत असल्याने आरोग्य यंत्रणाही सतर्क झाल्या आहेत. देशभरात कोरोनाच्या नवीन रुग्णात लक्षणीय वाढ झाली. मात्र, असे असले तरी दिलासादायक बाब म्हणजे गेल्या 24 तासात नोंदवण्यात आलेल्या कोरोनाच्या नवीन रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढली असल्याचे पाहायला मिळत आहे.

हे देखील पाहा -

गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे तब्बल 17,336 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. देशात सध्या 88,284 इतके कोरोना रुग्ण सक्रिय आहेत. याआधी गुरुवारी, देशात कोविड-१९ चे 13,313 नवीन रुग्ण आढळले होते. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, कोरोनामुळे 38 जणांचा मृत्यू झाला आहे.

देशात महाराष्ट्र (Maharashtra) आणि दिल्लीमध्ये (Delhi) गेल्या काही दिवसांपासून रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. यामुळे प्रशासन आणि आरोग्य विभागाच्या चिंतेत वाढ झाली आहे. देशात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळून आले आहेत. महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या नव्या रुग्णसंख्येत मोठी वाढ होत आहे. राज्यात गेल्या 24 तासात 5218 नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर एकूण 4989 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. आतापर्यंत राज्यामध्ये 77,77,480 कोरोनाबाधित बरे होऊन घरी परतले आहेत. 24 तासात नोंद झालेल्या रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्ण हे मुंबईतील आहे. तर एका कोरोनाबाधित रुग्णाने आपला जीव गमवाला. त्यामुळे राज्यातील मृत्यूदर हा 1.86 टक्के इतका झाला. राज्यात आज एकूण 24,867 सक्रिय रुग्ण संख्या आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eknath shinde: समोर अमित शाह, एकनाथ शिंदेंकडून 'जय गुजरातची' घोषणा|VIDEO

Eknath Shinde : जय गुजरात; एकनाथ शिंदेंची पुण्यात अमित शहांसमोरच घोषणा

Govindwadi Bypass Bridge : ६ वर्षांतच पुलाची दैना; कल्याणच्या गोविंदवाडी बायपास पुलाच्या कोट्यवधींच्या कामावर प्रश्नचिन्ह

Monsoon Hair Care: पावसाळ्यात केस गळण्याची समस्या? 'या' टिप्सने घ्या केसांची योग्य काळजी

मराठमोळ्या ठसक्यात तरुणीचा जोरदार डान्स; 'चाळ माझ्या पायांत' गाण्यावर दिला धमाकेदार परफॉर्मन्स

SCROLL FOR NEXT