अमूल, गोकूळ नंतर आता मदर डेअरीच्या दूध दरात वाढ Saam Tv
देश विदेश

अमूल, गोकूळ नंतर आता मदर डेअरीच्या दूध दरात वाढ

मदर डेअरीने देखील दूध विक्री दरामध्ये २ रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नवी दिल्ली - देशात पेट्रोल नंतर आता दूध दरांमध्ये देखील वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. अमूल Amul आणि गोकूळ Gokul पाठोपाठ मदर डेअरीने Mother Dairy देखील दूध विक्री दरामध्ये २ रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. आता ग्राहकांना मदर डेअरीचे दूध खरेदी करण्यासाठी २ रुपये जादा मोजावे लागणार आहे. Increase in milk price of Mother Dairy

मदर डेअरीचे नवीन दर उद्यापासून लागू होणार आहेत अशी माहिती देण्यात आली आहे. मदर डेअरीने फक्त दिल्ली आणि एनसीआरमध्ये ही दरवाढ केली आहे. त्यामुळे दिल्ली-एनसीआर वगळता इतर भागातील ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.

हे देखील पहा -

दिल्ली-एनसीआरमध्ये Delhi NRC एक लिटर क्रीम दूध ५५ रुपयांऐवजी आता ५७ रुपयांना मिळणार आहे आणि टोन्ड दूध ४५ रुपयांवरून ४७ रुपये झाले आहेत. यापूर्वी मदर डेअरीने २०१९ साली दूधाच्या दरांमध्ये वाढ केली होती. गेल्या वर्षभरात महागाई प्रचंड वाढली असून, कंपनीलाही या महागाईचा सामना करावा लागला. त्याचबरोबर कोरोना Corona महामारीमुळे दूध उत्पादनावरही परिणाम झाला असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. Increase in milk price of Mother Dairy

तर यापूर्वी १ जुलै रोजी अमूलने दूध दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला होता आणि त्यानुसार १ जुलैपासून दिल्ली, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि गुजरात येथील अमूलचे दूध उत्पादन महागले. तब्ब्ल दीड वर्षानंतरअमूलने आपल्या दूध विक्रीचे दर वाढवले आहे. कोरोना संकटाच्या काळात महागाईला तोंड देणाऱ्या ग्राहकांना Costumers एकामागून एक धक्के बसत आहेत.

शुक्रवारी गोकुळ दूध संघाकडून शेतकऱ्यांना उद्यापासून म्हशीच्या दूध खरेदी दरात प्रतिलिटर २ रुपये, तर गाईच्या दूध दरात १ रुपयाची वाढ करण्यात निर्णय घेतला आहे. ही दरवाढ कोल्हापूर Kolpaur विभाग वगळता राज्यातील इतर भागात दूध विक्रीच्या दरात दोन रुपये वाढ करण्यात आली आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Night Routine: रात्री झोपण्याआधी फक्त या २ गोष्टी करा, सकाळी प्रसन्न वाटेल

Maharashtra News Live Updates: आमदार राम सातपुते यांचे पोलिस ठाण्यासमोर आंदोलन

Maharashtra Election: प्रचाराच्या तोफा थंडावल्या; कोणी गाजवल्या कोणी वाजवल्या? राज्यभरात कोणत्या नेत्याच्या किती झाल्या सभा?

Anmol Bishnoi arrested : बाबा सिद्धिकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; मुख्य आरोपी अनमोल बिश्नोई अमेरिकेत सापडला

Tiger Shroff Baaghi 4: टायगर श्रॅाफचा कधीही न पाहिलेला अवतार; खतरनाक लूक व्हायरल

SCROLL FOR NEXT