Uttar Pradesh Income Tax Raids SAAM TV
देश विदेश

IT Raid : भ्रष्ट सरकारी बाबू IT च्या रडारवर; यूपीत एकाच वेळी २२ ठिकाणांवर छापे

लखनऊ आणि कानपूरसह २२ ठिकाणांवर आयकर विभागाच्या पथकांनी एकाच वेळी छापे मारले.

Nandkumar Joshi

Uttar Pradesh Income Tax Raids | लखनऊ: उत्तर प्रदेशातील १२ हून अधिक भ्रष्टाचारी आणि लाचखोर अधिकाऱ्यांविरोधात आयकर विभागाने बुधवारी मोठी कारवाई केली आहे. आयकर विभागाच्या पथकांनी एकाच वेळी १२ ठिकाणांवर छापे मारले.

मिळालेल्या माहितीनुसार, लखनऊ आणि कानपूरसह २२ ठिकाणांवर आयकर विभागाच्या पथकांनी एकाच वेळी छापे मारले. आयकर विभागाच्या निशाण्यावर उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) १२ भ्रष्टाचारी सरकारी अधिकारी आहेत.

उत्तर प्रदेशातील अनेक विभागांमध्ये कार्यरत असलेले जवळपास १२ सरकारी अधिकारी (Government Officer) आयकर विभागाच्या (Income Tax) रडारवर आहेत. अनेक विभागांमधील कार्यालयांवर छापे मारण्यात आले आहेत. गुप्तता बाळगून आयकर विभागाने ही कारवाई केली आहे. त्यामुळे राज्यात खळबळ उडाली आहे.

ऑपरेशन बाबू साहब पार्ट २ या मोहिमेंतर्गत काही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईला १८ जूनपासून दिल्लीतून सुरुवात झाली होती. आता ही कारवाई उत्तर प्रदेशातील लखनऊ आणि कानपूरसह अनेक ठिकाणी केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आयकर विभागाला यासंदर्भात गुप्त माहिती मिळाली होती. टेंडरपासून अनेक योजनांमध्ये या विभागांतील अधिकारी सामील आहेत. यासंदर्भात ठोस माहिती मिळाल्यानंतर आयकर विभागाच्या पथकांनी धाडसत्र सुरू केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नाशिकच्या रस्त्यावर भूत? भुताचे फोटो व्हायरल झाल्याने दहशत

मरण पत्करेन, पण माफी मागणार नाही; बिगबॉसमधून बाहेर पडताच दिव्या शिंदे काय बोलून गेली?

South Indian Chutney: वरण भातासोबत खा 'ही' साउथ इंडियन चटणी, झटपट वाचा रेसिपी

Maharashtra Live News Update: आरक्षण मागणीसाठी लवकरच पश्चिम महाराष्ट्रात बैठकासत्र; मनोज जरांगे पुन्हा अॅक्शन मोडमध्ये

Chanakya Niti: तोंडावर गोड बोलणाऱ्या धोकेबाज लोकांना कसं ओळखायचं? चाणक्यांनी सांगितली तब्बल 8 सुत्र

SCROLL FOR NEXT