Delhi Fire News Saam Tv
देश विदेश

Delhi Fire News: दिल्लीतील आयकर विभागाच्या कार्यालयाला भीषण आग, अग्निशमन दलाच्या 21 गाड्या घटनास्थळी दाखल

Delhi IT Department Fire: दिल्लीतून मोठी बातमी समोर येत आहे. येथील आयकर कार्यालयात भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. दिल्ली पोलिस मुख्यालयाच्या मागे आयकर विभागाची इमारत आहे.

साम टिव्ही ब्युरो

Delhi Fire News:

दिल्लीतून मोठी बातमी समोर येत आहे. येथील आयकर कार्यालयात भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. दिल्ली पोलिस मुख्यालयाच्या मागे आयकर विभागाची इमारत आहे. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या 21 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्याचं सांगण्यात येत आहे.

या इमारतीत अडकलेल्या लोकांना पायऱ्यांद्वारे बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. ही आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान शर्थीचे प्रयत्न करत आहेत.

दिल्ली अग्निशमन सेवेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, 'आम्हाला दुपारी 3.07 वाजता आयटीओ येथील आयकर कार्यालयाच्या सीआर इमारतीला आग लागल्याची माहिती मिळाली. एकूण 21 अग्निशमन दलाच्या गाड्या घेऊन आम्ही तिथे पोहोचलो. या प्रकरणाची चौकशी करून कायदा व सुव्यवस्था नियंत्रणात ठेवता यावी यासाठी आम्ही स्थानिक पोलिसांनाही या प्रकरणाची माहिती दिली. सोशल मीडियावर समोर आलेल्या काही व्हिडिओंमध्ये काही लोक आगीपासून वाचण्यासाठी खिडकीजवळ जात असल्याचे दिसत आहे.''

आणखी एका व्हिडीओमध्ये कुणालातरी स्ट्रेचरवर आणले जात असल्याचे दिसत आहे. यावेळी पोलिसांचा ताफाही दिसतो. या आगीत एक जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. ज्यांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या आगीत किती नुकसान झाले? त्याची संपूर्ण माहिती समोर आलेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Smart TV: स्मार्ट टीव्ही खरेदीत मोठी बचत, ८६ हजार रुपयांची सूट घेण्याची संधी

Maharashtra Live News Update: जिल्हाप्रमुख पद विकणे आहे ,चंद्रपुरमधील होर्डिंग्जमुळे उडाली खळबळ

Water For Kids: खेळण्याच्या आधी लहान मुलांनी किती पाणी प्यावं? जाणून घ्या डॉक्टरांचं मत

Cooking Tips: रोजचं वरण ठरेल आरोग्यदायी टॉनिक, फक्त 'हे' घालायला विसरू नका

GST चा १२ टक्के स्लॅब रद्द होणार? AC, ट्रॅक्टरसह विमा स्वस्त होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT