Corona Cases Update in India | Corona patient Updates Saam TV
देश विदेश

चिंताजनक! देशात गेल्या 24 तासांत 1 हजार 938 नवीन कोरोना रुग्णांची नोंद 67 मृत्यू

देशामध्ये कोरोनाच्या रुग्ण संख्यामध्ये थोडीशी वाढ झाली

वृत्तसंस्था

वृत्तसंस्था: देशामध्ये कोरोनाच्या रुग्ण संख्यामध्ये थोडीशी वाढ झाली आहे. गेल्या २४ तासामध्ये देशामध्ये १ हजार ९३८ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर कोरोनामुळे ६७ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. दरम्यान, काल देशामध्ये १ हजार ७७८ कोरोना रुग्णांची नोंद झाली होती, तर ६२ जणांचा मृत्यू झाला होता. देशामध्ये आतापर्यंत ४ कोटी ३० लाख १४ हजार ६८७ कोरोनाबाधित (Corona) रुग्ण आढळले आहेत. (Corona Cases Update in India)

हे देखील पहा-

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, काल देशामध्ये २ हजार ५३१ लोक कोरोनातून बरे झाले होते. यानंतर सक्रिय रुग्णांची संख्या २२ हजार ४२७ वर आली आहे. कोरोनामुळे आत्तापर्यंत ५ लाख १६ हजार ६७२ जणांचा मृत्यू झाले आहे. तर आतापर्यंत देशामध्ये ४ कोटी २४ लाख ७५ हजार ५८८ लोक कोरोनातून संसर्गमुक्त झाले आहेत. सध्या देशामध्ये मोठ्या प्रमाणावर लसीकरण सुरु आहे.

देशव्यापी लसीकरण (Vaccination) मोहिमेअंतर्गत आतापर्यंत लसींचे १८२ कोटींपेक्षा जास्त जास्त डोस देण्यात आले आहेत. काल देशामध्ये मध्ये ३१ लाख ८१ हजार ८०९ लसींचे डोस देण्यात आले आहेत. यानंतर आतापर्यंत १८२ कोटी २३ लाख ३० हजार ३५६ डोस लसींचे डोस देण्यात आल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. महाराष्ट्रातील कोरोनाची रुग्णसंख्या देखील आटोक्यात येत असल्याचे चित्र दिसत आहे.

काल राज्यामध्ये १४९ रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच गेल्या २४ तासामध्ये ३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यामध्ये गेल्या २४ तासात २२२ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. राज्याचा मृत्यूदर १.८२ टक्के झाला आहे. राज्यामध्ये आतापर्यंत ७७,२३, ९५९ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.११ टक्के झाले आहे. राज्यामध्ये आजपर्यंत ७, ९०, ६८, ३१९ प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आले आहेत. सध्या राज्यामध्ये १०८४ अॅक्टिव्ह रुग्ण आहे. यामध्ये राज्यामध्ये सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण मुंबईमध्ये आहेत. मुंबईत २७७ अॅक्टिव्ह रुग्ण आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मनमाड-इंदोर रेल्वे जमीन अधिग्रहण प्रकरणी बाधितांची रेल्वे अधिकाऱ्यांसोबत बैठक निष्फळ

Nitish Kumar : डॉक्टर महिलेचा हिजाब ओढणं पडलं महागात; मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याविरोधात FIR

Couples Tips: सुखी संसाराचं सिक्रेट समजलं, नवरा बायकोने रात्री झोपण्यापूर्वी या ५ गोष्टी नक्की करा

Famous Actress Death: 2025 मध्ये कोणत्या प्रसिद्ध अभिनेत्रींचे निधन झाले? संपूर्ण यादी

Maharashtra Politics: माणिकराव कोकाटेंना जमीन मंजूर पण आमदारकी जाणार? VIDEO

SCROLL FOR NEXT