बीड: महाविकास आघाडीचा धर्म पाळला जात नाही म्हणत, "तुम्हाला आम्ही डिस्टर्ब करत नाहीत, तुम्ही आम्हाला डिस्टर्ब करू नका, दोन हात करायची वेळ आली तर आम्ही देखील कमी पडणार नाही". असे म्हणत बीड मधील शिवसंपर्क अभियान दरम्यान, शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी, आघाडी सरकारमधील मंत्री आणि आमदारांवर जोरदार टीका केली आहे.
हे देखील पहा-
उस्मानाबादमध्ये आमचा पालकमंत्री आहे. तिथे महाविकास आघाडीचा धर्म पाळला जातो. मात्र बीडमध्ये उलट असल्याचं म्हणत, त्यांनी थेट धनंजय मुंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्यावर निशाणा साधला आहे. "तुम्हाला आम्ही डिस्टर्ब करत नाहीये, त्यामुळे कृपा करुन आम्हाला डिस्टर्ब करू नका, दोन हात करायची वेळ आली तर आम्ही ही कमी पडणार नाही". असा थेट इशारा निंबाळकर यांनी दिला आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर महाविकास आघाडीत दरी पडण्याची शक्यता आहे.
ते पुढे म्हणाले की, की शून्यतं असं कधी समजायचं नाही. मी माझ्यावरुन सांगतो, 3 जून 2006 रोजी माझ्या वडिलांची हत्या करण्यात आली. हत्येचं कारण एवढंच होतं, माझे वडील 2004 मध्ये विधानसभा निवडणुकीत (election) केवळ 484 मतांनी अपक्ष निवडणूक लढवून पराभूत झाले होते.
केवळ विरोधकांनी पेपरमध्ये बातमी छापून आणली होती. की पवनराजेंचा मला पाठिंबा आहे. म्हणून ते अपक्ष मैदानात उतरले होते. त्यामुळ त्याच्या लक्षात आले की आपल्या मागं कोण नाही, एकदा हा माणूस संपवला की आपल्याला राजकारणात कोणीही विरोधक राहणार नाही. यांनीच भूमिकेतून नीच प्रवृत्तीच्या माणसांनी नीच कृत्य केलं. असे म्हणत खासदार (MP) ओमराजे निंबाळकरांनी आपले वडिल पवनराजे निंबाळकरांची हत्या का करण्यात आली? यावर त्यांनी भाष्य केले आहे.
Edited By- Digambar Jadhav
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.