पवनराजे निंबाळकरांची हत्या का केली? आणि स्वतःहा ओमराजे निंबाळकर राजकारणात आले

शिवसेनेच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी पेटून उठलं पाहिजे
Om Rajenimbalkar
Om Rajenimbalkarविनोद जिरे
Published On

बीड: उस्मानाबाद जिल्ह्याचे माजी खासदार वडील स्व. पवनराजे निंबाळकर यांची हत्या का करण्यात आली? आणि स्वतः ओमराजे निंबाळकर राजकारणातील (politics) र माहीत नसताना, राजकारणात का आले? यावर खुद्द शिवसेना (Shiv Sena) खासदार ओमराजे निंबाळकर यांनी भाष्य केले आहे. ते म्हणाले, की शून्यतं असं कधी समजायचं नाही. मी माझ्यावरुन सांगतो, 3 जून 2006 रोजी माझ्या वडिलांची हत्या करण्यात आली. हत्येचं कारण एवढंच होतं, माझे वडील 2004 मध्ये विधानसभा निवडणुकीत (election) केवळ 484 मतांनी अपक्ष निवडणूक लढवून पराभूत झाले होते.

केवळ विरोधकांनी पेपरमध्ये बातमी छापून आणली होती. की पवनराजेंचा मला पाठिंबा आहे. म्हणून ते अपक्ष मैदानात उतरले होते. त्यामुळ त्याच्या लक्षात आले की आपल्या मागं कोण नाही, एकदा हा माणूस संपवला की आपल्याला राजकारणात कोणीही विरोधक राहणार नाही. यांनीच भूमिकेतून नीच प्रवृत्तीच्या माणसांनी नीच कृत्य केलं. असे म्हणत खासदार (MP) ओमराजे निंबाळकरांनी आपले वडिल पवनराजे निंबाळकरांची हत्या का करण्यात आली? यावर त्यांनी भाष्य केले आहे.

हे देखील पहा-

पुढे बोलतांना ते म्हणाले की, त्याच दिवशी मला राजकारणातला र माहीत नसताना, जिद्दीने उभा ठाकलो. मला लोकांना दाखवून द्यायचं होतं, "तू एक पवनराजे जरी गोळ्या घालून संपवला असेल, तरी दुसरा पवनराजे तितक्याच ताकतीचा तुझ्या पुढे उभा करेल". त्यावेळी आमचे पाहुणेरावळे येऊन सांगायचे, कशाला नादी लागता, वडिलांचं काय झालं हे पाहिलंय. मात्र, "आपण पवनराजेंच्या पोटी जन्म घेतला, हे सांगायची सुद्धा लाज वाटेल' त्यामुळे आता माघार नाही, आता जे काय काही होईल ते होऊ द्या, आता सर्वस्व संपलंय. या भावनेतून मी राजकारणात उतरलो". असं म्हणत खासदार ओमराजेंनी राजकारण का आलो? यावर भाष्य केले आहे. पुढे सत्ता कशी काबीज केली यावर बोलतांना देखील ते म्हणाले की, त्यावेळी ग्रामपंचायत (Gram Panchayat) सदस्यापासून ते कॅबिनेट मंत्रीपर्यंत, दुसऱ्या- तिसऱ्या कोणाची सत्ता नव्हती, त्यांचीच सत्ता होती.

Om Rajenimbalkar
9 वर्षीय चिमुकलीवर नराधमाकडून बलात्कार करुन जीवेठार मारणाऱ्या 2 नराधमांना अटक

त्यामुळे दुसऱ्या कुणाची बाहेर पडण्याची ताकत नव्हती. जिल्हा परिषद प्रचाराला गेलो तर माझ्या घरातील दोन माणस आणि दुसरा एक अशी तीनच माणसं प्रचाराला होतो. इतकी दहशतमय बिकट परस्थिती होती. त्यामुळ लोक सांगायचे हे तुम्हाला शक्य नाही. मात्र, त्याच ठिकाणी अडीच हजार मतांनी आमचे दोन्ही उमेदवार लोकांनी निवडून दिले. आणि पहिल्याच झटक्यात लोकांनी जिल्हा परिषदची सत्ता आम्हाला काढून दिली. असे म्हणत सत्ता काबीज करण्यात कशी सुरुवात केली. यावर देखील भाष्य केले आहे. ते बीड (Beed) शहरात शिवसेना अभियान कार्यक्रमात बोलत होते. केवळ जिल्ह्यातील शिवसेनेची विस्कटलेली घडी पुन्हा चांगली बसावी आणि जिल्ह्यात शिवसेनेनी मुसंडी मारावी. यासाठी खासदार ओमराजे निंबळकरांनी प्रत्येक कार्यकर्ता पेटून उठला पाहिजे यासाठी स्वतःच उदाहरण देत. विरोधकांवर निशाणा साधला आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com