BJP/Shivsena Saam TV
देश विदेश

Goa Assembly Election Result: गोव्यात शिवसेना-राष्ट्रवादीपेक्षा 'नोटा'ला जास्त मतं

गोवा आणि उत्तर प्रदेशात (Goa and Uttar Pradesh) महाराष्ट्रातील सत्ताधारी शिवसेने (Shivsena) आपले उमेदवार उभे केले होते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पणजी : आज देशातील पाच राज्यांमध्ये झालेल्या निवडणुकांचे निकाल समोर येत आहेत आणि यामध्ये सर्वात जास्त चर्चेत असणारी राज्य म्हणजे गोवा आणि उत्तर प्रदेश (Goa and Uttar Pradesh) कारण या दोन्ही ठिकाणी महाराष्ट्रातील सत्ताधारी शिवसेने (Shivsena) आपले उमेदवार उभे केले होते. मात्र या निवडणुकांमध्ये भाजपने (BJP) आपला करिश्मा कायम राखत उत्तर प्रदेश आणि गोव्यात जवळपास बहूमत मिळवल्याचं चित्र समोर आलं आहे.

मात्र या ठिकाणी निवडणुकांच्या आधी तळ ठोकून बसलेल्या संजय राऊतांच्या प्रयत्नांना काही फायदा झालेला नाही. गोव्यात शिवसेना आणि राष्ट्रवादीला नोटापेक्षा कमी मतं पडल्याचे आकडे समोर येय आहेत. गोव्यात (Goa) हाती आलेल्या निकालानुसार नोटाला १.१७ टक्के मतं पडली आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेसला १.०५ टक्के आणि शिवसेनेला ०.२५ टक्के मतं मिळाली आहेत. त्यामुळे राऊतांनी जो महाराष्ट्राप्रमाणे गोव्यात आम्ही सत्ता स्थापन करु हा केलेला दावा फोल ठरला असून या आघाडीत सामील न होण्याचा निर्णय काँग्रेसने घेतल्याचा काँग्रेसला फायदा झाल्याच दिसून येत आहे. तर आता गोव्यातील शिवसेनेच्या नेत्यांकडून भाजपने गोव्यात मोठ्या प्रमाणात पैशांचा वापर केल्याने आम्हाला अपयश आल्याचं सांगत आहेत.

गोव्यात सध्यस्थितीत असणारे आकडे खालीलप्रमाणे -

हे देखील पहा -

गोव्यात एकूण विधानसभेच्या जागा ४० आहेत.

भाजपला १८ जागांवरती आघाडीवर आहे तर काँग्रेस ११ जागांवरती आघाडीवरती आहे.

आम आदमी पार्टी २ तर 'मगोप' ५ आणि इतर ४ जागांवरती आघाडीवरती आहेत.

Ediited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune: रेव्ह पार्टीचा 1:42 मिनिटाचा INSIDE VIDEO समोर; २ तरूणी अन् मित्रांसोबत खडसेंचा जावई नशेन धुत

Schoking News : लग्नाचं आमिष दाखवतं कॅफेत घेऊन गेला; २९ वर्षीय तरुणाचे ३३ वर्षीय महिलेवर अत्याचार

Maharashtra Live News Update: यवतमाळमध्ये आमदार सोनवणे विरोधात आदिवासी संघटना आक्रमक

Solapur Police : सालार गँगला लावला 'मोक्का'; पोलिसांची वर्षातील तिसरी कारवाई

Pune Rave Party : खडसेंच्या जावयाला रेव्ह पार्टीत अटक, कट्टर विरोधक गिरिश महाजनांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...

SCROLL FOR NEXT