Goa : गोव्यात मुख्यमंत्री प्रमोद सावंत निवडणूक हारू शकतात; काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा दावा Saam TV
देश विदेश

Goa : गोव्यात मुख्यमंत्री प्रमोद सावंत निवडणूक हारू शकतात; काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा दावा

'प्रमोद सावंत आता प्रॉपर्टी सावंत झाले आहेत असं लोकं बोलतात तसंच आताच्या निवडणुकीत मुख्यमंत्री प्रमोद सावंत हारू शकतात अशी परिस्थिती आहे.'

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रश्मी पुराणिक -

पणजी : गोव्यात भाजपचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Pramod Sawant) निवडणूक हारू शकतात. तसंच गोव्यात काँग्रेसच बहुमताने सरकार स्थापन करणार असा दावा महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Naredra Modi) सध्या जी वक्तव्य करत आहेत ती त्यांच्या पदाला शोभणारी नाहीत. मोदी आता कार्टूनिस्ट झाले आहेत. तसंच नेहरू गोवा स्वातंत्र्य संग्रामाचा भाजप इतिहास खोटा सांगत असून, गोव्यातील लोकांना वेगळं राज्य हवं हे स्पष्ट झाल्यावर निर्णय झाला. भाजपला हुकूमशाही अपेक्षित असते पण आम्ही असे नाही आम्ही लोकशाही मानणारे लोकं आहे असही पटोले म्हणाले.

मोदी यांनी मीच करू शकतो असं सांगून सत्ता मिळवली नेहरू, गांधी, मनमोहन सिंग यांच्यावरती टीका करून आपण श्रेष्ठ अशी भूमिका त्यांनी मांडली. कालपर्यंत ते टीका करत होते, मात्र आता त्यांच्यावर टीका होत आहे.

तसंच प्रमोद सावंतांबद्दल मतदारसंघात नाराजी आहे. प्रमोद सावंत आता प्रॉपर्टी सावंत झाले आहेत असं लोकं बोलतात तसंच आताच्या निवडणुकीत मुख्यमंत्री हारू शकतात अशी परिस्थिती आहे असही पटोले म्हणाले. दरम्यान त्यांना मलिकांच्या वक्तव्यावरती प्रश्न विचारला असता ते म्हणाल्ये 'मी त्यांच्या सारखं भविष्य सांगू शकत नाही. पण मी जितकं फिरलो त्यानुसार गोव्यात (Goa) आम्हाला बहुमत मिळणार.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Google Gemini : हवी ती फ्रेम, हवा तो सीन आणि हवा तसा टकाटक व्हिडिओ...Gemini चं नवं फीचर करणार मार्केट जाम!

SIRमुळे महानगरांच्या मतदारांना झटका, 3 जिल्ह्यांमधील 84 लाख मतदार गायब

Nagpur Accident: उपचार घेऊन घरी परतत होते... वाटेतच काळाने गाठलं; पत्नीसमोरच 74 वर्षीय पतीचा हिट अँड रनमध्ये मृत्यू

जरांगेंना उपोषणासाठी लाल गोधडी का लागते? जरांगेंच्या लाल गोधडीचं गुपित काय?

Maharashtra News Live Update: मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी आमदार प्रसाद लाड अंतरवाली सराटीत दाखल

SCROLL FOR NEXT