Crime News Saam tv
देश विदेश

Crime News : धक्कादायक! परिक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्याचा चाकूहल्ला, ८ जणांचा मृत्यू, १७ जखमी

China Stabbing case : एका विद्यार्थ्याने चाकूने हल्ला करून चक्क 8 जणांची हत्या केली. विद्यार्थ्याने केलेल्या हल्ल्यात 17 जण जखमीही झाल्याचे स्थानिक पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.

Namdeo Kumbhar

यिक्सिंग : (China Stabbing case)  चीनच्या जिआंगसू प्रांतातील यिक्सिंग शहरातील एका शाळेत हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. एका विद्यार्थ्याने चाकूने हल्ला करून चक्क 8 जणांची हत्या केली. विद्यार्थ्याने केलेल्या हल्ल्यात 17 जण जखमीही झाल्याचे स्थानिक पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.

यिक्सिंग शहरातील पोलिसांनी मृतांच्या संख्येची पुष्टी केली असून, जिआंगसू प्रांतातील वूशी व्होकेशनल इन्स्टिट्यूट ऑफ आर्ट्स अँड टेक्नॉलॉजी येथे संध्याकाळी हा हल्ला झाला. अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला आहे की हल्लेखोर दुसरा कोणी नसून एक शालेय विद्यार्थी आहे ज्याचे वय 21 वर्षे आहे.

नापास झाल्यामुळे संताप अनावर

यिक्सिंगच्या सार्वजनिक सुरक्षा ब्युरोने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, 21 वर्षीय संशयित, आडनाव जू, याला घटनास्थळी पकडण्यात आले आणि त्याने गुन्ह्याची कबुली दिली, असे राज्य वृत्तसंस्था शिन्हुआने सांगितले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यावर्षी परीक्षेत नापास झाल्याबद्दल आणि इंटर्नशिपच्या पगारावर असमाधानी असल्याबद्दल संताप व्यक्त करण्यासाठी आरोपी शाळेत पोहोचला होता.

मे महिन्यातही उघडकीस आली होती चाकूने वार केल्याची घटना 

याआधी मे महिन्यातही चीनच्या दक्षिण जिआंग्शी प्रांतातील एका शाळेत चाकू हल्ला झाल्याची घटना समोर आली होती. या हल्ल्यात दोन जणांचा मृत्यू झाला तर 10 जण जखमी झाले. मात्र, घटना घडली त्यावेळी मृतांमध्ये लहान मुलांचाही समावेश होता की नाही हे स्पष्ट झाले नाही. हा हल्ला एका ४५ वर्षीय महिलेने केल्याचे पोलिसांनी सांगितले होते, तिने फळे तोडण्यासाठी चाकूचा वापर केला होता. पोलिसांनी सोशल मीडियावर दिलेल्या निवेदनात म्हटले होते की, या महिलेवर नंतर त्यांचे नियंत्रण होते.

चीनमध्ये चाकू हल्ल्याच्या घटनेत वाढ

चीनमध्ये गेल्या काही महिन्यांत चाकू हल्ल्याच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये मानसिक आजाराने ग्रस्त असलेल्या एका व्यक्तीने युनानमधील निवासी जिल्ह्यात लोकांवर चाकूने हल्ला केला आणि दोघांचा मृत्यू झाला आणि सात जण जखमी झाले. याच्या काही आठवड्यांपूर्वी, जुलैमध्ये दक्षिण-पूर्व प्रांतातील ग्वांगडोंगमधील बालवाडीत तीन मुलांसह सहा जणांची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली होती.

Edited By- नितीश गाडगे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नांदूर-मध्यमेश्वर धरणातून गोदावरी पत्रात पाण्याचा विसर्ग वाढवला

Shocking News : संतापजनक! राजकीय वाद टोकाला, महिला मध्यरात्री उठली अन्...

Mithila Palkar: मिथिला पालकरचं वय वाढतय अन् सौंदर्यही खुलतय...

Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील सातही आरोपींची नावं समोर; कोकेन-गांजा, १० मोबईल अन् २ कार जप्त

Anil Gote : भ्रष्टाचाऱ्यांसाठी जेल म्हणजे भाजप कार्यालय; माजी आमदार अनिल गोटेंचा सरकारवर हल्लाबोल

SCROLL FOR NEXT