Imran Khan  Saam Tv
देश विदेश

इम्रान खान यांच्या भवितव्याचा आज फैसला; 10,000 सुरक्षा कर्मचारी तैनात

किस्तान पीपल्स पार्टीचे (पीपीपी) अध्यक्ष बिलावल भुट्टो झरदारी म्हणाले की, इम्रान खान हिंचाराची योजना आखत आहेत आणि त्याचा परिणाम पाकिस्तानच्या भविष्यावर होईल.

वृत्तसंस्था

लाहोर: पाकिस्तानचे (Pakistan) पंतप्रधान इम्रान खान यांचा आज पंतप्रधान पदाचा फैसला होणार आहे. आज अविश्वास प्रस्तावावर (No Confidence Motion) मतदानापूर्वी हिंसाचार आणि संघर्षाच्या भीतीने इस्लामाबादमध्ये (Islamabad) हजारो सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे, सरकारने राजधानीतील केट झोन सील करण्यास सुरुवात केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, इस्लामाबादच्या रेड झोनमध्ये एकूण 10,000 सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. सर्वसामान्यांना आवारात प्रवेश दिला जाणार नाही. रेड झोनमध्ये प्रवेश करण्यासाठी फक्त मारगला रोड खुला केला जाईल, तर इतर प्रवेश मार्गांवर तीन थरांचे कंटेनर बसवले जातील. त्याचबरोबर मतदानाच्या दिवशी रावळपिंडीत राजकीय रॅलींना इस्लामाबादमध्ये प्रवेश दिला जाणार नाही.

पराभवामुळे होणार हे गृहीत धरुन इम्रान खान आंदोलनाची योजना आखत आहेत, त्यांच्या कृत्याचा जाब त्यांना विचारला जाईल, असे म्हणत विरोधकांनी इम्रान खान यांच्यावर निशाणा साधला आहे. पाकिस्तान पीपल्स पार्टीचे (पीपीपी) अध्यक्ष बिलावल भुट्टो झरदारी म्हणाले की, इम्रान खान हिंचाराची योजना आखत आहेत आणि त्याचा परिणाम पाकिस्तानच्या भविष्यावर होईल.

इम्रान खान यांच्यावर विदेशी कारस्थानाचा आरोप

रविवारी नॅशनल असेंब्लीच्या अधिवेशनाच्या अजेंड्यावर अविश्वास प्रस्तावावर मतदान आहे. पाकिस्तानच्या 'डॉन' या वृत्तपत्रामध्ये शनिवारी संपादकीयमध्ये म्हटले आहे की, इम्रान खान रविवारच्या अविश्वास प्रस्तावात आपला येऊ घातलेला पराभव फिरवण्याच्या दृष्टीने कोणतीही पावले उचलू शकले नाहीत. इम्रान खान यांनी परदेशात षडयंत्र सुरू केले असून पाकिस्तानातील काही राजकारणी या लोकांना मदत करत असल्याचा आरोप केला आहे. 'सरकार पाडण्यासाठी राजकारण्यांना बकऱ्यांसारखे विकत घेतले जात असल्याचे सिद्ध झाले आहे. ते म्हणाले, 'अधिकृत दस्तऐवजात असे म्हटले आहे की जर तुम्ही इम्रान खानला हटवले तर तुमचे अमेरिकेसोबतचे संबंध चांगले होतील.

इम्रान खान यांनी तरुणांना आपल्या सरकारच्या विरोधात रचलेल्या कथित "परकीय षड्यंत्रा" विरोधात "शांततापूर्ण आंदोलन" करण्याचे आवाहन केले, परंतु त्यांना पाकिस्तानी लष्करावर टीका करू नका असेही सांगितले आहे. इम्रान खान शनिवारी म्हणाले, 'तुम्ही आज बाहेर यावे आणि निषेध नोंदवावा अशी माझी इच्छा आहे. शांततापूर्ण आंदोलनासाठी बाहेर या. इम्रान खान यांनी आंदोलकांना पाकिस्तानी लष्करावर टीका करू नका असे सांगितले. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान म्हणाले, 'माझे लष्कराशी कोणतेही मतभेद नाहीत. त्यांनी निर्णय घेतला आणि आम्ही त्याचा आदर करतो. लष्कराने तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला आहे आणि आम्ही त्याचा आदर करतो.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : दारू पिण्यावरुन वाद, थोरल्या भावाने धाकट्या भावाचा केला खून; पुण्यात भयंकर घडलं

Maharashtra Live News Update: महाराष्ट्र कुस्तीगिर परिषदेच्या अध्यक्षपदी आमदार रोहित पवार यांची बिनविरोध निवड

Devendra Fadnavis : महाराष्ट्राच्या मनात काय? आगामी निवडणुकीआधी CM देवेंद्र फडणवीसांनी केलं मोठं भाष्य

Aare Ware Beach : पावसाळ्यात 'आरे-वारे' बीचचं सौंदर्य फॉरेनपेक्षा कमी नाही

Pune Rave Party: आधी हॉटेलची रेकी, नंतर आखला एकनाथ खडसेंच्या जावयाला अडकविण्याचा डाव; खेवलकरांच्या वकिलांचा धक्कादायक खुलासा

SCROLL FOR NEXT