जात पंचायतीचा जाच; एक रुपयात फोनवर केला महिलेचा 'घटस्फोट'

जातपंचायतीने मोबाईल निरोप पाठवून दिला घटस्फोट झाल्याचा केला निवाडा, पीडित महिलेनं सांगितली आपबिती.
Nashik News
Nashik News Saam TV
Published On

नाशिक जिल्ह्यातील सिन्नरमध्ये (Nashik- Sinnar) जात पंचायतीचा आणखी एक जाच समोर आलाय. जातपंचायतीने चक्क मोबाईल घटस्फोट दिल्याचा दावा पीडित महिलेने केला आहे. सिन्नरच्या अश्विनी या महिलेचे लोणी (अहमदनगर) येथे लग्न झाले होते. लग्नानंतर सासरच्या व्यक्तींनी तिचा छळ केल्याने ती पुन्हा माहेरी सिन्नरला आली. याचा फायदा घेऊन सासरच्या लोकांनी लोणी आणि सिन्नर येथे वैदू समाजाची जात पंचायत बसवली. जात पंचायतीने पिडीत महिलेला न विचारता तिच्या अनुपस्थितीत तिचा घटस्फ़ोट केला. त्यासाठी सासरकडील लोकांनी भरपाई केवळ एक रुपया पंचांकडे दिला. जात पंचायतीने पीडित महिलेला पोलीस ठाण्यात जाण्यापासून देखील रोखले, असं पीडित महिलेचं म्हणणं आहे.

आठ दिवसांपूर्वी तिच्या नवऱ्याने दुसरे लग्न केल्याने तिला अन्याय असह्य झाल्यानंतर तिने जातपंचायतीच्या सामाजिक कार्यकर्त्यांकडे आपली कैफियत मांडली आहे. न्यायालयाने घटस्फ़ोट दिला नसतांना पंचांच्या भूमिकेमुळे नवऱ्याने दुसरे लग्न केले. त्यामुळे जात पंचायतच्या पंचांचा विरोध मोडून काढत ती लढायला तयार झाली असून जातपंचायतीचे पंच आणि सासरचे या विरोधात तक्रार करणार असल्याचं पीडित महिला आणि तिच्या आईचं म्हणणं आहे. दरम्यान या प्रकरणी अद्याप पोलीस ठाण्यात तक्रार अथवा गुन्हा दाखल झालेला नाही.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com