Imran Khan Saam Tv News
देश विदेश

Imran Khan Jailed: माजी PM इम्रान खान यांच्या अडचणीत वाढ, आणखीन १४ वर्षांचा तुरूंगवास; पत्नीही अटकेत

Al Qadir Trust scandal: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान आणि त्यांची पत्नी बुशरा बीबी यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. अल - कादिर ट्रस्ट प्रकरणात न्यायालयाने दोघांनाही दोषी ठरवून त्यांच्याविरूद्ध शिक्षा सुनावली आहे.

Bhagyashree Kamble

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान आणि त्यांची पत्नी बुशरा बीबी यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. अल - कादिर ट्रस्ट प्रकरणात न्यायालयाने दोघांनाही दोषी ठरवून त्यांच्याविरूद्ध शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाने इम्रान खान यांना १४ वर्षांची शिक्षा सुनावली असून, पत्नी बुशरा बीबी यांना ७ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

पाकिस्तानच्या डॉन न्युजच्या वृत्तानुसार, माजी पंतप्रधान इम्रान खान आणि त्यांची पत्नी बुशरा बीबी यांना शुक्रवारी अल कादिर ट्रस्ट प्रकरणात दोषी ठरवलं आहे. या दोघांवर राष्ट्रीय तिजोरीचे ५० अब्ज पाकिस्तानी रूपयांचे नुकसान केल्याचा आरोप आहे. ९ मे रोजी अल कादिर ट्रस्ट प्रकरणात त्यांना अटक करण्यात आली होती. यानंतर अनेक महत्त्वाच्या लष्करी तळांवर हल्ले झाले होते. नंतर खान यांच्या पक्ष पीटीआयने या अटकेविरोधात सर्वोच्च न्यायालयात अपील केले होते.

अल कादिर ट्रस्ट प्रकरणात न्यायालयाने इम्रान खान यांना १० लाख रूपायांचा दंड ठोठावला आहे. तसेच १४ वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. त्यांची पत्नी बुशरा बीबी यांच्यावर ५ लाख रूपयांचा दंड ठोठावण्यात आला असून, त्यांना ७ वर्षांची शिक्षा जाहीर केली आहे. दंड न भरल्यास ६ महिन्यांची अधिक तुरंगवासाची शिक्षा या जोडप्याला भोगावी लागेल. दरम्यान, १८ महिन्यांपासून अडियाला तुरूंगात इम्रान खान कैद आहेत.

अल -कादिर ट्रस्टचं नेमकं प्रकरण काय?

अल कादिर ट्रस्ट प्रकरण बहरिया टाऊनमधील जमीन आणि पैशांच्या व्यवहाराशी संबधित आहे. इम्रान खान आणि त्यांची पत्नी बुशरा बीबी यांनी बहरिया टाऊन लिमिटेडकडून अब्जावधी रूपये आणि जमीन घेतल्याचा आरोप आहे. डिसेंबर २०२३ साली त्यांच्यावर NABनं त्यांच्या विरोधात भ्रष्टकाराचा गुन्हा दाखल केला होता. त्यांच्यावर सुमारे १९ अब्ज रूपयांती फसवणूक केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात न्यायालयाने दोषी ठरवले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Water Shortage : मुंबईत २ दिवस पाणीपुरवठा बंद राहणार; कुठे कमी दाबाने तर कुठे पूर्णपणे बंद? जाणून घ्या

Maharashtra Live News Update: कळमेश्वर नगर परिषद निवडणूक प्रचार सभेत आशिष देशमुखांचे वादग्रस्त वक्तव्य

चिमुकल्यांना कोंडून अंगणवाडीसेविका बैठकीला, अंगणवाडीसेविकेचा प्रताप, पालकांचा संताप

बीडमध्ये रक्षकच बनले भक्षक! मुंबईच्या सराफ व्यापाऱ्याला धमकावत उकाळले ४ लाख

Tere Ishq Mein: 'तेरे इश्क में'च्या रिलीजपूर्वी क्रिती सॅनन आणि धनुष पोहोचले वाराणसीला, गंगा आरतीचे फोटो व्हायरल

SCROLL FOR NEXT