Weather Update 12 January 2024 Saam TV
देश विदेश

IMD Rain Alert: ढगाळ हवामानामुळे थंडी पळाली, देशातील ३१ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा; वाचा वेदर रिपोर्ट

IMD Weather Forecast: हवामान खात्याने देशातील ३१ जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

Satish Daud

Weather Update 12 January 2024

गेल्या तीन ते चार दिवसांपासून देशातील काही राज्यांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. ऐन हिवाळ्यात आलेल्या पावसामुळे खरीप हंगामातील पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. अवकाळीचं संकट कधी दूर होईल, असा प्रश्न बळीराजाला पडला आहे. अशातच हवामान खात्याने देशातील ३१ जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

स्कायमेटच्या अंदाजानुसार, महाराष्ट्रातील काही भागात शुक्रवार आणि शनिवारी पावसाच्या हलक्या सरी कोसळतील. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातील तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज (Rain Alert) वर्तवण्यात आला आहे. यासोबतच राज्यातील तापमानात घट होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे.

महाराष्ट्रापाठोपाठ उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान आणि अरुणाचल प्रदेशातील काही जिल्ह्यांना पावसाचा इशारा (Heavy Rain) देण्यात आला आहे. मध्य प्रदेशातील खरगोन, खंडवा, झाबुआ, इंदूर, धार, बुरहानपूर, बरवानी, अलीराजपूर, नीमच, मंदसौर या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

यासोबतच रतलाम, शाजापूर, आगर-मालवा, देवास, उज्जैन, अशोकनगर, दतिया, गुना, शिवपुरी, ग्वाल्हेर. विदिशा, सिहोर, राजगढ, रायसेन, भोपाळ, नर्मदापुरम, हरदा आणि बैतुलमध्ये वादळी वाऱ्यासह गारपीटीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

दुसरीकडे पंजाब, हरियाणा, आसाम, मेघालय, मिझोराम, त्रिपुरा, जम्मू विभाग, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, ओडिशा, बिहार, पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये दाट धुके पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या दोन ते तीन दिवसांत या भागात थंडीचा कडाका जाणवेल, असा अंदाजही हवामान खात्याने वर्तवला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : अवघे गरजे पंढरपूर…! मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

SCROLL FOR NEXT