Maharashtra Politics: आमदार अपात्रता निकालानंतर मातोश्रीवर खडाजंगी, देसाई आणि राऊत आले आमनेसामने?

Thackeray Group News: आमदार अपात्रता निकालानंतर मातोश्रीवर ठाकरे गटाच्या नेत्यांची बैठक झाली आहे. या बैठकीत ठाकरे गटाचे नेते संजय राऊत आणि अनिल देसाई हे आमनेसामने आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
Sanjay Raut Vs Anil Desai
Sanjay Raut Vs Anil DesaiSaam Tv
Published On

>> गिरीश कांबळे

Sanjay Raut Vs Anil Desai:

मुंबईतून एक मोठी राजकीय बातमी समोर आली आहे. शिवसेना आमदार अपात्रता निकालानंतर मातोश्रीवर ठाकरे गटाच्या नेत्यांची बैठक झाली आहे. या बैठकीत ठाकरे गटाचे नेते संजय राऊत आणि अनिल देसाई हे आमनेसामने आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कालच्या निकालानंतर ठाकरे गटामध्ये अंतर्गत धुसफूस सुरू झाली आहे. 2018 मध्ये पक्षाच्या घटनेतील बदलांची निवडणूक आयोगात नोंद का नाही, यावरून पक्षात खडाजंगी झाली आहे. पक्षाच्या प्रशासकीय कामाची जबाबदारी ही अनिल देसाई आणि सुभाष देसाई यांच्यावर सोपवण्यात आली होती. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Sanjay Raut Vs Anil Desai
Chhatrapati Sambhajinagar: बराच वेळ झाला गेली कुठे? मुलांना शोधताना पालक हादरले, ४ चिमुकल्यांचा दुर्दैवी अंत

घटनादुरुस्तीची नोंद निवडणूक आयोगात न केल्याचं खापर अनिल देसाई आणि सुभाष देसाईंवर फोडण्यात आलंय. घटनेतील बदल, संघटनात्मक रचना, निवडणूक आयोगाशी पत्र व्यवहार यामध्ये त्रुटी आढळल्याने विधिमंडळ अध्यक्षाने विरोधात निकाल दिल्याचं पक्षातील एका गटाचं मत झालं आहे. (Latest Marathi News)

याबाबत उद्धव ठाकरेंशी चर्चा करण्यासाठी संजय राऊत, अरविंद सावंत आणि सुभाष देसाई मातोश्रीवर दाखल झाले होते. या सर्व प्रक्रियेमध्ये सक्रिय सहभाग असणाऱ्या अनिल देसाई यांच्यावर आजच्या बैठकीत अविश्वास आणि संताप व्यक्त करण्यात आल्याचं सूत्रांनी म्हटलं आहे.

Sanjay Raut Vs Anil Desai
Kopar Khairane: प्रेयसीच्या वाढदिवशीच तिला लॉजवर नेलं अन् हत्या केली, नेमकं काय घडलं?

या त्रुटीमुळे कालचा निकाल उद्धव गटाच्या विरोधात गेल्याचं प्रमुख नेत्यांचं ठाम मत आहे. याबाबी पक्षाला अंधारात का ठेवण्यात आल्या? असा सवाल या नेत्यांकडून उपस्थित केला जात आहे. याचदरम्यान राऊत आणि देसाई हे समोरासमोर आले, असं सूत्रांनी सांगितलं आहे. तूर्तास पक्षातील सर्व नेत्यांनी एकत्रित राहून परिस्थितीला सामोरे जाण्याचे उद्धव ठाकरेंनी सूचना केल्या असल्याचंही सांगितलं जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com