IMD weather warning for rain  
देश विदेश

Weather Update: ११ राज्यात धो-धो पावसाचा अंदाज, ताशी ४० ते ५० किमीच्या वेगाने वाहणार वारे

IMD weather warning for rain: देशात कुठे पाऊस तर कुठे थंडीचा कहर सुरू आहे. आज ११ राज्यांमध्ये पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

Priya More

देशामध्ये सध्या हवामानात चढ-उतार सुरू आहे. कुठे पाऊस तर कुठे कडाक्याची थंडी असं हवामान आहे. पावसाळा संपला तरी देशातील अनेक राज्यात सध्या पावसाचा धुमाकूळ सुरूच आहे. आज देशातील ११ राज्यांना पाऊस झोडपून काढण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने या सर्व राज्यांना पावसाचा अलर्ट दिला आहे. काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी हलक्या स्वरुपाचा पाऊस बरसण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रासह देशात कुठे काय स्थिती असेल हे आपण जाणून घेणार आहोत...

भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, आज देशातील ११ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये पावसाची शक्यता आहे. २४ ते २६ नोव्हेंबर दरम्यान तामिळनाडू, पुदुचेरी आणि कराईकलमध्ये अनेक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. केरळमध्ये २४ ते २७ नोव्हेंबर दरम्यान पाऊस सुरू राहण्याची शक्यता आहे. २५ ते २८ नोव्हेंबर दरम्यान लक्षद्वीपमध्येही अनेक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तामिळनाडू, पुदुचेरी आणि कराईकलच्या काही भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. अनेक भागांमध्ये मेघगर्जनेसह आणि वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याचा अंदाज आहे. यावेळी वाऱ्याचा वेग ताशी ४० ते ५० किलोमीटरपर्यंत जाण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: काटोल-नागपूर मार्गावर एसडीओंच्या शासकीय स्कॉर्पिओचा अपघात

Winter Health : थंडीच्या दिवसांत हाताची बोटे सुन्न पडतायत? दुर्लक्ष करणं जीवावर बेतलं, ६ आजारांची असू शकतात लक्षणं

Tuesday Horoscope: रखडलेली कामे मार्गी लागतील! 5 राशींच्या व्यक्तींनी राहा सावध; वाचा मंगळवारचे राशीभविष्य

धुळे कारागृह अधीक्षकाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन; 3 महिन्यांनी होणार होते निवृत्त

कमी बोला, काम जास्त करा" नगराध्यक्षांना उपमुख्यमंत्री शिंदेंचा सज्जड दम

SCROLL FOR NEXT