IMD Warns Unseasonal rain Alert in tamil nadu kerala jammu kashmir arunachal pradesh Maharashtra Weather Updates Saam TV
देश विदेश

Unseasonal Rain Alert: पुढील ४८ तासांत गारपीटीसह मुसळधार पावसाचा इशारा; हवामान खात्याकडून 'या' राज्यांना अलर्ट

IMD Rain Alert: एकीकडे थंडीची चाहूल जाणवत असताना दुसरीकडे भारतीय हवामान खात्याने अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

Satish Daud

IMD Unseasonal Rain Alert

मिचाँग चक्रीवादळाने तयार झालेलं ढगाळ वातावरण निवळल्याने उत्तर भारतात कडाक्याची थंडी पसरली आहे. राजधानी दिल्ली आणि उत्तर प्रदेशातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा घसरला आहे. एकीकडे थंडीची चाहूल जाणवत असताना दुसरीकडे भारतीय हवामान खात्याने अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

हवामान खात्याने जारी केलेल्या अंदाजानुसार, तामिळनाडूमध्ये १५ ते १७ डिसेंबर, केरळ आणि माहेमध्ये १६ ते १८ डिसेंबर, तर लक्षद्वीपमध्ये १७ आणि १८ डिसेंबरदरम्यान हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपीटीचा (Rain Alert) अंदाजही वर्तवण्यात आला आहे.

सध्या केरळमध्ये ढगाळ वातावरण तयार झालं असून येत्या ४८ तासांत वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा इशारा (Heavy Rain) देण्यात आला आहे. याशिवाय जम्मू-काश्मीर, लडाख, गिलगिट-बाल्टिस्तान, मुझफ्फराबादमध्ये हलका पाऊस आणि हिमवर्षाव होण्याची शक्यता आहे.

पूर्व आसाम, अरुणाचल प्रदेश, लक्षद्वीप आणि दक्षिण केरळमध्ये हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. दुसरीकडे दिल्लीत तापमानाचा पारा घसरल्याने पंजाब आणि हरियाणामध्ये दाट धुके पडण्याचा अंदाज आहे. उत्तर प्रदेश आणि त्रिपुराच्या काही भागातही धुक्यांचा प्रभाव जाणवणार असल्याचं हवामान खात्याने सांगितले.

महाराष्ट्रात कसं राहिल हवामान?

हवामान खात्याने केरळच्या काही भागात जोरदार गारपीटीचा अंदाज वर्तवल्याने याचा परिणाम महाराष्ट्रातही होण्याची शक्यता आहे. पुढील ४८ तासांत महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. उर्वरित भागात ढगाळ वातावरण राहणार असून काही ठिकाणी हुडहुडी वाढण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : पुण्यात थोड्याच वेळात होणार मतमोजणीला सुरुवात

Bachchu Kadu : विधानसभा निकालाआधी बच्चू कडूंना मोठा दिलासा, कोर्टाकडून निर्दोष सुटका, नेमकं प्रकरण काय?

Shukra Shani Yuti: पुढच्या महिन्यात होणार शुक्र-शनीची युती; 'या' राशींच्या तिजोरीत येणार पैसा

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT