IMD Rainfall Alert saam tv
देश विदेश

IMD Rainfall Alert: आज आणि उद्या देशातील 'या' राज्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळणार, IMD ने जारी केला अलर्ट

IMD Rain Alert: आज आणि उद्या देशातील 'या' राज्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळणार, IMD ने जारी केला अलर्ट

Satish Kengar

Weather Updates Today:

राज्यात पावसाने पाठ फिरवली आहे. असं असलं तरी दक्षिण भारतात मुसळधार पाऊस पडत आहे. तमिळनाडू आणि केरळमध्ये आज आणि उद्या मुसळधार पाऊस पडणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. याशिवाय पुढील पाच दिवस देशातील इतर राज्यांतील हवामानात कोणताही मोठा बदल होणार नाही, असंही हवामान खात्याने सांगितलं आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, कर्नाटक आणि तामिळनाडूच्या किनारपट्टीवर गेल्या 24 तासांत मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. त्याचबरोबर केरळ, माहे, तामिळनाडू, पुद्दुचेरी, कराईकल, लक्षद्वीपमध्ये पुढील पाच दिवस हलका ते मध्यम पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दक्षिण कर्नाटकात 30 आणि 31 ऑक्टोबर रोजी हलक्या ते मध्यम पावसाची नोंद होऊ शकते. मुसळधार पावसाबद्दल बोलायचे झाले तर, आज आणि उद्या तामिळनाडू आणि केरळमध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे.  (Latest Marathi News)

यातच उत्तर भारतात पाऊस पडत नसून तापमानात हळूहळू घट होत असून थंडी वाढत आहे. दिल्लीबद्दल बोलायचे झाल्यास, पुढील एका आठवड्यासाठी येथे किमान तापमान 15-16 अंश सेल्सिअसच्या आसपास राहणार आहे, तर कमाल तापमान 33 अंश सेल्सिअसच्या आसपास असू शकते.

उत्तर प्रदेशाबद्दल बोलायचे झाले तर लखनऊमध्येही तापमान हळूहळू कमी होत आहे. लखनौमध्ये पुढील काही दिवस किमान तापमान 18-19 अंश सेल्सिअसच्या आसपास राहणार आहे, तर कमाल तापमान 32-33 अंश सेल्सिअसच्या आसपास राहील. दिवसा हलका सूर्यप्रकाश असू शकतो, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : उल्हासनगरमध्ये ऑफिस खुर्ची बनवणाऱ्या कारखान्याला मध्यरात्री भीषण आग

Nashik Tourism : नाशिकला गेलाय? मग 'हा' ऐतिहासिक किल्ला नक्की पाहा

Vashi Fire : दिवाळीत संसाराची राखरांगोळी, वाशीतील आगीत ४ जणांचा मृत्यू

Amruta Khanvilkar : "दिवाळीचा फटाका"; 'चंद्रा'ला पाहून चाहते झाले सैराट

Maharashtra Rain Alert : राज्यात पावसाची उघडीप, 'या' जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट

SCROLL FOR NEXT