IMD Rain Alert  Saam Digital
देश विदेश

IMD Rain Alert : 9 एप्रिलपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज; हवामान खात्याने दिला इशारा

Heatwave Warning : हवामान खात्याने येत्या दोन दिवसांत पूर्व आणि द्वीपकल्पीय भारताच्या काही भागात उष्णतेची लाट येण्याचा इशारा दिला आहे. तर 9 एप्रिलपर्यंत ईशान्य भागात जोरदार पाऊस आणि वादळ येण्याची शक्यता आहे.

Sandeep Gawade

IMD Alert

हवामान खात्याने येत्या दोन दिवसांत पूर्व आणि द्वीपकल्पीय भारताच्या काही भागात उष्णतेची लाट येण्याचा इशारा दिला आहे. तर 9 एप्रिलपर्यंत ईशान्य भागात जोरदार पाऊस आणि वादळ येण्याची शक्यता आहे. शुक्रवार आणि शनिवारी ओडिशा, पश्चिम बंगाल, झारखंड, विदर्भ, उत्तर कर्नाटक, आंध्र प्रदेशचा किनारी भाग आणि रायलसीमा आणि तेलंगणाच्या भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तमिळनाडू, पुद्दुचेरी, केरळ, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, त्रिपुरा, अरुणाचल प्रदेश, ओडिशा आणि ग पश्चिम बंगालच्या काही भागांमध्येही मुसळधार पावसाचा अंदाज आहे.

उत्तर-पश्चिम आणि पश्चिम राजस्थानच्या काही भागातही विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता (Rain Alert) आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातही पुढील तीन दिवस तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा वाहून हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

अरबी समुद्रावर तयार झालेल्या चक्रवात स्थितीमुळे अरबी समुद्रावरून गुजरातकडे आर्द्रतायुक्त उष्ण वारे वाहत आहे. परिणामी मुंबईसह ठाणे, पालघर आणि रायगडच्या किनारपट्टीवर तापमानात झपाट्याने वाढ झाली आहे.

महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमधील तापमान (Weather) चाळीशी पार गेलंय. त्यामुळे नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागत आहे. दुसरीकडे ईशान्य भारतातील काही राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.

कोणकोणत्या भागात कोसळणार पाऊस?

येत्या २४ तासांत महाराष्ट्र, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय आणि नागालँडमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. मणिपूर मिझोरम आणि त्रिपुरामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

पश्चिम हिमालयीन भागात हलका ते मध्यम पाऊस आणि हिमवर्षाव होऊ शकतो. उत्तर-पश्चिम आणि पश्चिम राजस्थानच्या काही भागात मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Liver Cancer Symptoms: भूक कमी अन् सतत थकवा जाणवतोय? तुम्हाला लिव्हर कॅन्सर तर नाही ना? वाचा लक्षणे

Maharashtra Live News Update: वडापावमध्ये आढळले प्लास्टिकचे तुकडे

Home Vastu Tips: वास्तुशास्त्रानुसार घराच्या दरवाज्यांना कोणता रंग द्यावा?

GK: ४,००० किमीचा प्रवास! देशातील सर्वात लांब महामार्ग कोणता?

EPFO New Scheme : EPFO ची नवी योजना, १ लाखांपर्यंत पगारदारांना १५ हजारांचा फायदा! ३० एप्रिलपर्यंत नोंदणीची संधी |VIDEO

SCROLL FOR NEXT