Weather Update  Saam tv
देश विदेश

Weather: महाराष्ट्रावर नवं संकट! आयएमडीकडून ९ जिल्ह्यांना हायअलर्ट, कुठे पाऊस तर, कुठे उन्हाचा कडाका

MaharashtraWeather: IMD च्या अंदाजानुसार, पुढील दोन दिवसांत पश्चिम बंगाल, ओडिशा, छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.

Bhagyashree Kamble

मार्च महिना सुरू झाल्यापासून उकाडा वाढला आहे. अनेक राज्यात सूर्य आग ओकत आहे. मात्र, कुठे उकाडा तर, कुठे पावसाची रिपरिप पाहायला मिळत आहे. देशात हवामान विभागाकडून अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. काही भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता आहे. आयएमडीने वर्तवलेल्या अंदाजानुसार ५० ते ६० किमी वेगानं वारं वाहण्याची शक्यता आहे. अनेक जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे.

आयएमडीने दिलेल्या इशाऱ्यानुसार, पश्चिम बंगाल, ओडिशा, छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रामध्ये पुढील २ दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुढील ४८ तास जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

राजस्थानच्या अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच दिल्लीमध्ये या काळात जोरदार वारे वाहणार असून, तापमान ३४ अंश सेल्सिअसपर्यंत राहणार आहे. यासह झारखंडमध्येही जोरदार पावसाची शक्यता आहे.

उत्तर भारतानंतर महाराष्ट्रातही हवामान विभागाने पावसााचा इशारा दिला आहे. पुढील २ दिवस पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, विदर्भात आज वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. विदर्भातील अनेक जिल्ह्यांना आज येलो तर काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. सध्या नागपूरसह विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss 20 : बिग बॉसमध्ये मोठा ट्विस्ट! अचानक बाजी पलटली, 'या' स्पर्धकाचा पत्ता कट

Morning Walk Benefits: रोज सकाळी काही मिनिटं मारा फेरफटका, होतील 6 आश्चर्यकारक बदल

Maharashtra News Live Update: येत्या तीन वर्षांत वन खात्यात २५ ते ३० हजार लोकांची भरती होणार!

Gokul Election : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी आज मतदान! सत्तेचा फैसला कोणाच्या बाजूने?

Maharashtra Weather : दसऱ्यापूर्वी मुसळधार पावसाची शक्यता, सोलापूरसह १४ जिल्ह्यांना झोडपून काढणार, IMD चा येलो अलर्ट

SCROLL FOR NEXT