IMD Cold Alert Saam Digital
देश विदेश

IMD Cold Alert: देशातील या राज्यात तापमान पोहोचलं शून्य अंशापर्यंत, तज्ज्ञांनी व्यक्त केली चिंता

IMD Cold Alert News: देशातील अनेक भागात कडाक्याच्या थंडीमुळे लोक हैराण झाले आहेत. दक्षिण भारतातील राज्यांमध्ये सागरी क्षेत्र असल्याने थंडीची तीव्रता कमी असते, मात्र काही डोंगराळ भागात थंडीचा प्रभाव दिसून येत आहे.

Sandeep Gawade

IMD Cold Alert

देशातील अनेक भागात कडाक्याच्या थंडीमुळे लोक हैराण झाले आहेत. दक्षिण भारतातील राज्यांमध्ये सागरी क्षेत्र असल्याने थंडीची तीव्रता कमी असते, मात्र काही डोंगराळ भागात थंडीचा प्रभाव दिसून येत आहे. यंदा हवामानात मोठा बदल झाला असून तामिळनाडूच्या अनेक भागात तापमान शून्यावर पोहोचलं आहे. उधगमंडलमच्या कंथाल आणि थलाईकुंठा येथे तापमान 1 अंश सेल्सिअस नोंदवले गेले आहे. तर बोटॅनिकल गार्डनमध्ये पारा २ अंश सेल्सिअसवर नोंदवण्यात आला आहे. तर संदीनल्लाह येथे ३ अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे.

तामिळनाडूच्या डोंगराळ जिल्ह्यांमध्ये तापमानातील घसरणीमुळे नागरिकांना कडाक्याच्या थंडीचा सामना करावा लागत आहे. वातावरणातील बदलामुळे होणार्‍या बदलांमुळे लोक त्रस्त झाले आहेत. त्याचा परिणाम शेतीवर झाला आहे. हिरवीगार जंगलं धुक्याने झाकली आहेत. दाट धुक्यामुळे दृश्यमानतेवर परिणाम झाला आहे. स्थानिक लोकांच्या मते इतकी थंडी कधीही जाणवली नव्हती. कधी न दिसणाऱ्या ठिकाणीही लोक शेकोट्या पेटवून थंडीपासून बचाव करताना दिसत आहेत. दरम्यान अवेळी आणि कडाक्याच्या थंडीमुळे पर्यावरण तज्ज्ञांनीही चिंता व्यक्त केली आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Matar Karanji Recipe : थंडीत आवर्जून बनवा खुसखुशीत मटार करंजी, खायला चवदार अन् करायला सोपी

Maharashtra Nagar Parishad Live : चंद्रपुरात मतदाराने ईव्हीएम फोडले

Young Stroke Causes: तरुण वयात स्ट्रोक होण्याची कारणं कोणती? तज्ज्ञांनी दिली महत्वाची माहिती

राज्यात थंडीचा कडाका; 'दिट वाह' चक्रीवादळामुळे पश्चिम महाराष्ट्रात गारठा|VIDEO

महाडमधील राडा, आधी कार्यकर्ते भिडले आता नेत्यांमध्ये शाब्दिक चकमक; तटकरेंचा गोगावलेंवर घणाघात

SCROLL FOR NEXT