Biparjoy Cyclone Update Saam Tv
देश विदेश

Gujarat Biparjoy Cyclone: बिपरजॉय चक्रीवादळाचा धोका वाढला, गुजरातमधील 8 जिल्ह्यांना रेड अलर्ट

Gujarat Government: गुजरातमध्ये मदतीसाठी एनडीआरएफ (NDRF), एसडीआरएफ (SDRF), कोस्टगार्डसह (Coast Guard) लष्कर (Indian Army) तैनात करण्यात आले आहे.

Priya More

Biparjoy Cyclone: बिपरजॉय चक्रीवादळाचा (Biparjoy Cyclone) धोका आणखी वाढत चालला आहे. लवकरच हे चक्रीवादळ गुजरातच्या (Gujarat) किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. त्यामुळे गुजरातमधील अनेक जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट (Raid Alert) जारी करण्यात आला आहे. या चक्रीवादळाची तीव्रता लक्षात घेता प्रशासन सज्ज झाले आहे. त्याचसोबत गुजरातमध्ये मदतीसाठी एनडीआरएफ (NDRF), एसडीआरएफ (SDRF), कोस्टगार्डसह (Coast Guard) लष्कर (Indian Army) तैनात करण्यात आले आहे.

बिपरजॉय चक्रीवादळ गुजरातमध्ये धडकण्यापूर्वी गुजरात-महाराष्ट्राच्या किनारी भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडत आहे. मुंबई-भुज-राजकोटमध्ये 7 जणांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. बिपरजॉय चक्रीवादळ 15 जून रोजी गुजरातमधील मांडवी आणि पाकिस्तानच्या कराची दरम्यान पोहोचेल. गुजरातमधील सौराष्ट्र आणि कच्छमधून ते जाणे अपेक्षित आहे. भारतीय हवामान खात्याने या वादळामुळे ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

हवामान खात्याने बिपरजॉय चक्रीवादळामुळे सौराष्ट्र आणि कच्छमध्ये रेड अलर्ट जारी केला आहे. हे चक्रीवादळ सध्या गुजरातमधील जाखाऊ बंदरापासून 280 किमी अंतरावर आहे. देशातील 9 राज्यांमध्ये चक्रीवादळाचा प्रभाव दिसून येत आहे. गुजरातमधील आठ जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. एनडीआरएफ, एसडीआरएफ, कोस्ट गार्ड व्यतिरिक्त मदत आणि बचावासाठी लष्कर तैनात करण्यात आले आहे. गुजरातमधील 7 जिल्ह्यांमधून 30 हजार लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे.

या चक्रीवादळामुळे रेल्वेच्या कामकाजावरही परिणाम झाला आहे. वादळाच्या इशाऱ्यामुळे पश्चिम रेल्वेने सुमारे 95 रेल्वे ट्रेन रद्द केल्या आहेत. त्याचसोबत काही ट्रेन शॉर्ट टर्मिनेट केल्या आहेत. केंद्रीय मंत्री पुरुषोत्तम रुपाला यांनी सांगितले की, द्वारका जिल्ह्यात 400 पेक्षा अधिक शेल्टर होम तयार करण्यात आले आहे. याठिकाणी नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हवलण्यात येत आहे.

बिपरजॉय चक्रीवादळ पाकिस्तानच्या किनारपट्टीच्या दिशेने पुढे सरकत आहे. सध्या हे वादळ कराचीच्या किनाऱ्यापासून 380 किमी आणि थट्टापासून 390 किमी अंतरावर आहे. बिपरजॉय चक्रीवादळाचा धोका लक्षात घेता पाकिस्तानमध्ये देखील अलर्ट जारी करण्यात आला आहे. हे चक्रीवादळ सिंधमधील सर्वात जुने बंदर केटी बंदरजवळ धडकू शकते. सध्या लोकांना सुरक्षित स्थळी नेण्याचे काम सुरू आहे. लष्कराने आतापर्यंत 80 हजार लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : साकोलीत नाना पटोले आघाडीवर

Horoscope Today: कोणत्या राशींसाठी आजचा दिवस असेल भाग्यशाली, वाचा राशीभविष्य

Maharashtra Election Results : कोण मुख्यमंत्री, कोण आमदार! विधानसभा निवडणूक निकालाआधीच झळकले विजयाचे बॅनर

IND vs AUS : पहिल्या सामन्यात मार्नस लाबुशेनकडून चिटींग? मोहम्मद सिराज संतापला, वादात कोहलीचीही उडी, पाहा Video

Maharashtra Assembly Election Result : धाकधूक अन् टेन्शन वाढलं! १०० मतदारसंघात काटें की टक्कर, काहीही होऊ शकतं, कोण ठरणार किंगमेकर?

SCROLL FOR NEXT