मला भीती वाटते की माझ्यावर बलात्कार होऊन मला ठार मारले जाईल, दोन मुलांची आई आणि अफगाणिस्तानातील महिला म्हणून मला आता माझी आणि कुटुबांसाठी भिती वाटू लागली आहे. तालिबानी आम्हाला मारुन टाकतील, महिलांचे अपहरण करतील आणि त्यांच्यावर बलात्कार करतील, अशी भिती अफगाणिस्तानातील महिला सैनिक कुब्रा बेहरोज (Kubra Behroz) यांनी व्यक्त केली आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी अफगाणिस्तानातील (Afganistan) परिस्थिती आणि तालिबान्यांच्या (Taliban) राजवटील महिलांना दिल्या जाणाऱ्या वागणूकीचे भयावह वास्तव मांडले आहे.
हे देखील पहा-
कुब्रा बेहरोज २०११ मध्ये जेव्हा अफगाण नॅशनल आर्मीमध्ये सामील झाल्या तेव्हा मला स्वतचा खुप अभिमान वाटला होता. मला माझ्यावर कोणाचेही वर्चस्व नको होते. मला माझ्या पायावर उभे राहायचे या उद्देशाने मी सैन्यात दाखल झाले. ज्याला अनेक पुराणतवाद्यांनी झिडकारले होते, पण माझे माझ्या देशावर प्रेम आहे आणि आम्ही आधुनिक जगात पाऊल टाकणाऱ्या अफगाणांची पुढची पिढी आहोत." असे कुब्रा बेहरोज म्हणतात.
पण गेल्या काही दिवसांपासून देशावर तालिबान्यांनी अफगाणिस्तानावर कब्जा करायला सुरुवात केली, तेव्हापासून देशावर संकटाचे वारे घोंगावू लागले आहेत. मी आज सकाळी कामावर जायला निघाले तेव्हा रस्त्यावर, चौकांमध्ये कोणीही दिसत नव्हते, मी माझ्या कामाच्या ठिकाणी गेले तिथेही कोणी नव्हते. रस्त्याने येताना पाहिले, ब्युटी पार्लरच्या भिंती आणि खिडक्यांवर रंग लावले जात होते. कोणालाही काय करावे हे समजत नाहीये, आता माझे सहकारी देखील आम्हा महिला सैनिकांना घर आणि देश सोडून जाण्यास सांगत आहेत. आता देशावरचा धोका अधिकच वाढला असल्याचं त्यांनी सांगितलं.
कुब्रा बेहरोज म्हणतात, आम्ही तालिबान्यांच्या हाती लागलो तर ते आमचा छळ करतील, आमचे डोके उडवतील किंवा आमच्यावर बलात्कार करतील, आम्हाला मारुन टाकतील. तर बेहरोज यांचा भाऊ हादेखील अफगाण आर्मीमध्ये होता, जो गेल्या आठवड्यात अफगाणिस्तानातील जखमी झाला. त्याने बेहरोज यांना सांगितले की, तालिबान्यांनी दोन महिलांचा शिरच्छेद केला. याचे कारण म्हणजे त्या महिला पोलीस होत्या.
तालिबानी सैनिकांनी लग्नाच्या नावाखाली महिला आणि अल्पवयीन मुलींवर बलात्कार केल्याच्या सोशल मीडियावर अपुष्ट बातम्याही समोर आल्याचे बेहरोज यांनी सांगितले. मात्र अफगाणिस्तानात झिना प्रथेनुसार, अफगाणिस्तानात जर एखाद्या मुलीवर बलात्कार झाला तर तिला तिच्या बलात्काऱ्याला तिच्याशी लग्न करण्यास भाग पाडले जाते. अन्यथा तिच्या "लज्जास्पद" वर्तनामुळे तिच्या व्यापक कुटुंब आणि समाजातून बहिष्काराला सामोरे जावे लागते.
कुब्रा बेहरोझ यांनी सांगितले की, 2010 मध्ये अफगाणिस्तान सैन्यात भरती झाल्या. सहा महिन्यांच्या अधिकारी प्रशिक्षणात शस्त्रे प्रणाली, नकाशा वाचन, प्रगत संगणक साक्षरता, प्रथमोपचार आणि अमेरिकन, ब्रिटिश आणि जॉर्डनियन प्रशिक्षकांकडून गहन शारीरिक प्रशिक्षण यांचा समावेश होता.
मात्र जेव्हापासून बेहोरोज सैनिक झाल्या तेव्हापासून त्यांना त्रास दिला जात आहे. 2014 मध्ये, कामावर असताना काही समाजकंटकांनी त्यांच्या घराची तोडफोड केली. त्यावेळी त्यांनी सैन्यातून राजीनामा दिला आणि त्या आपल्या कुटुंबासह काबूलला स्थलांतरित झाल्या पण त्याना कोठेही काम न मिळाल्याने त्यांनी पुन्हा सैन्यात रुजू झाल्या.
अलिकडच्या आठवड्यात धमक्या आणि निनावी फोन कॉल वाढले आहेत. त्यांचा देश अराजकतेत उतरला आहे आणि काबूलमध्ये राहणे जोखमीचे आहे. अफगाणिस्तानात एखाद्याला मारुन टाकणे म्हणजे तो केकच्या तुकड्यासारखे आहे. कोणाला मारुन टाकताना ते दोनदा विचार करत नाहीत. ”
बेहरोज म्हणतात, आता त्यांना पाकिस्तानात पळून जाण्याशिवाय दुसरा कोणताही मार्ग नाही. आमच्याकडे पासपोर्ट नसले तरी आम्हाला आता बेकायदेशीरपणे सीमा ओलांडण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे."बेहरोज यांच्या आयुष्यात हा प्रवास काही नवीन नाही. १९९० मध्ये त्या सहा वर्षांच्या असताना त्यांनी तालिबानसोबत झालेल्या गृहयुद्धात आपले कुटुंब गमावले आणि आता पुन्हा इतिहासाची पुनरावृत्ती होत आहे. असेही बेहरोज यांनी सांगितले.
Edited By -Anuradha
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.