
सुरज सावंत
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा ( Underworld don Daud Ibrahim ) पुतण्या रिजवन कासकरने (Rizwan Kaskar) जामीन मिळावा यासाठी मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) धाव घेतली आहे. मुंबईच्या खंडणी विरोधी पथकाने २०१९ मध्ये रिजवानला एका व्यावसायिकाकडे खंडणी मागितल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. रिजवान हा दाऊदचा भाऊ इक्बाल कासकरचा (Iqbal Kaskar) मुलगा आहे.
रिजवनने याचिकेत मुंबईच्या खंडणी विरोधी पथकाने दाखल केलेला गुन्हा हा चुकिचा आहे. या गुन्ह्यांशी त्याचा काहीही संबध नसल्याचं त्याचं म्हणण आहे. या याचिकेवर १५ सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे संपूर्ण प्रकरण हवलाचा मास्टर माइंड अहमद रजा वडारिया याच्या अटकेनंतर पुढे आला. वडारिया हा कुख्यात गुंड आणि दाऊदचा उजवा हात छोटा शकिलचा जवळचा हस्तक आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अश्फाकची एका व्यापाऱ्यांसोबत पैशावरून वाद सुरू होता. हा वाद चायनातून इलेक्ट्राॅनिक वस्तू खरेदीकरून तो भारतात विकण्याचा व्यवसायातून झाला होता. अश्फाकला त्या व्यापाऱ्याला १५ लाखरुपये देणं होतं. जे पैसे त्याला द्यायचे नव्हते. म्हणूनच अश्फाकने वडारियाला मध्यस्थि घेतले. त्यानंतर व्यापाऱ्याला १२ जून २०१९ ला व्यावसायिकला इंटरनॅशनल नंबरहून फोन आला. त्यावेळी समोरील व्यक्तीने त्याची ओळख फहीम मचमच अशी सांगितली होती. त्याने ते पैसे जमा केल्याचे सांगत पैसे न मागण्याबाबत दोन ते तीन वेळा धमकावले.
हे देखील पहा-
या घटनेनंतर पीडित व्यापाऱ्याने पोलिसांकडे मदत मागवत गुन्हा नोंदवला. या गुन्ह्यानंतर पोलिसांनी फरार आरोपी वडारिया विरोधात लूक आऊट नोटीस जारी केली होती. १५ जुलै २०१९ रोजी वडारिया मुंबईत येत असल्याची माहिती मिळताच पोलिस सतर्क झाले. वडारिया विमानतळावर उतरताच पोलिसांनी त्याला अटक केली. वडारियाच्या अटकेनंतर याप्रकरणातील रिजवनचा सहभाग निश्चित झाला. पोलिसांच्या डोळयात धुळ फेकण्यासाठी वडारिया आणि रिजवान हे दोघं दुबईत एकमेकांना भेटायचे. कालांतराने वडारियाची ओळख रिजवानने मचमचशी करून दिली.
वारियाच्या अटकेनंतर चौकशीत नाव समोरआल्याचे लक्षात येताच, 17 जुलैला रिजवान देश सोडून पळण्याच्या तयारीत होता. याची कुण कुण लागतच खंडणी विरोधी पथकाने सापळा रचून त्याला अटक केली. तपासात दाऊदच्या घरातील नवीपिढीही दाऊदच्या दहशतीचा वापर खंडणी उकळण्यासाठी करत असल्याचे तपासात समोर आले आहे. मात्र लाजे खातर रिजवान कासकर हे आडनाव लावत नव्हता. रिजवानच्या पासपोर्टवर मोहम्मद रिज़वान इक़बाल अहमद शेख़ अस लिहिलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.