mahakumbh 2025 saam tv
देश विदेश

Mahakumbh 2025 : IIT बॉम्बे वाले बाबा ते कबूतर बाबा; महाकुंभ मेळ्यातील अनोख्या बाबांची सर्वत्र चर्चा, वाचा सविस्तर

maha kumbh mela 2025 : महाकुंभ मेळ्यात लाखो भक्तांनी यंदा हजेरी लावली आहे. या मेळ्यात सोशल मीडियावरीने अनेक प्रसिद्ध बाबांनी हजेरी लावली आहे. या बाबांच्या आयुष्याशी निगडीत बाबी लोकांमध्ये चर्चेत आहे.

Vishal Gangurde

महाकुंभ मेळ्यात देशभरातून साधू आणि संत पोहोचले आहेत. यामध्ये सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या बाबांचाही समावेश आहे. या बाबांमध्ये आयआयटी बॉम्बे वाले बाबा ते कबूतर बाबांचा समावेश आहे. या सर्व बाबांची देशभर चर्चा होत आहे.

आयआयटी बॉम्बे वाले बाबा

महाकुंभ मेळ्यात अभय सिंह अर्थात आयआयटी बॉम्बे वाले बाबा म्हणून प्रसिद्ध झाले आहेत. ते जुन्या आखाड्याशी संबंधित आहेत. सध्या त्यांची जोरदार चर्चा सुरु आहे.

काटे वाले बाबा

महाकुंभ मेळ्यातील काटे वाले बाबा देखील भरपूर प्रसिद्ध झाले आहेत. त्यांचा दावा आहे की, मागील ४० वर्षांपासून काट्यावर झोपूनच तपस्या करत आहेत.

कबूतर वाले बाबा

महाकुंभ मेळ्यात महंत राजापुरी महाराज यांचा खास अंदाज चर्चेत आहे. त्यांच्या डोक्यावर नेहमी कबूतर बसलेला असतो. त्यांनी शाही स्नान देखील कबूतरासोबतच केलं आहे.

स्कॉर्पिओ बाबा

महाकुंभात नागा साधू कुशपुरी हे स्कॉर्पिओ कारच्या बोनेटवर बसूनच भक्तांना आशीर्वाद देतात. ते भक्तांमध्ये स्कॉर्पिओ बाबा म्हणून प्रसिद्ध आहेत.

लिलिपूट बाबा

लिलिपूट बाबा हे नावाने प्रसिद्ध असलेले संत गंगा गिरी ५७ वर्षांचे आहेत. त्यांची उंची तीन फुटापेक्षा कमी आहे. त्यांनी मागील ३२ वर्षांपासून आंघोळ केली नाही. त्यांनी गुरुकडून दीक्षा घेताना कधीच आंघोळ करणार नसल्याचं वचन घेतलं होतं.

धान्य बाबा

धान्य बाबांना पाहणारे लोक आश्चर्यचकीत होतात. त्यांनी त्यांच्या डोक्यावर गहू आणि बाजरी पिकवली आहे. ते डोक्यावरील गहू आणि बाजरी या पिकांवर बारकाईने लक्ष देत असतात.

रुद्राक्ष वाले बाबा

महंत गीतानंद गिरी यांनी मागील ६ वर्षांपासून रुद्राक्ष धारण केलं आहे. त्यांनी वयाच्या १२ व्या वर्षी शपथ घेतली होती. त्यांचा अंगावर एकूण ४५ किलो वजनाचं रुद्राक्ष आहे.

चावी वाले बाबा

महाकुंभामध्ये चावी वाले बाबा देखील खूप प्रसिद्ध आहेत. त्यांचं नाव हरिश्चंद्र विश्वकर्मा आहे. ते उत्तर प्रदेशच्या रायबरेली येथे राहणारे आहेत. ते गळ्यात २० किलोहून अधिक वजनाची चावी गळ्यात अडकवतात. तसेच इतर आकाराच्या चाव्या देखील अडकवल्या आहेत.

पायलट बाबा

सोमेश्वर पुरी महाराज हे जुन्या आखाड्याशी संबंधित आहे. ते एअरफोर्समधून निवृत्त झाले आहेत. त्यांनी बँकेत देखील नोकरी केली आहे. सध्या ते संन्यासी जीवन व्यथित करत आहेत. ते पायलट बाबा म्हणून प्रसिद्ध आहेत.

रबडी वाले बाबा

रबडी वाले बाबा देखील महाकुंभ मेळ्यात प्रसिद्ध आहेत. ते मेळ्यात भक्तांना रबडी वाटतात. गुजरातहून आलेले रबडी वाले बाबा यांचं नाव महंत देवगिरी महाराज आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पंढरपूर दौऱ्यावर

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

SCROLL FOR NEXT