नवी दिल्ली : काश्मिरमध्ये पुन्हा पंडितांवर हल्ले वाढले आहेत. दोन दिवसापूर्वीच राहुल भट या तरुणाची हत्या झाली. त्यामुळे पुन्हा वातावरण तापले आहे. आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. आता काश्मिरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी एक वक्तव्य केलं आहे. काश्मिरी पंडितांवरील हल्ले थांबवायचे असतील तर अगोदर 'द काश्मिर फाईल्स' (The Kashmir Files) या चित्रपटावर बंदी घातली पाहिजे, अशी मागणी माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी केली आहे.
'देशात मुस्लिमांविरोधात द्वेषाचे वातावरण आहे, हेच काश्मीरमधील मुस्लिम तरुणांमध्ये संतापाचे कारण आहे, असंही फारुख अब्दुल्ला म्हणाले. काश्मिरी फाईल्स सत्य कथेवर आधारित आहे का, असा प्रश्नही मी सरकारला विचारला होता. खरच एखादी मुस्लिम अगोदर एखाद्या हिंदुला मारेल का, त्यानंतर त्याच रक्त भातात टाकून त्याच्या बायकोला खायला देईल का, आम्ही एवढे खालच्या पातळीवर गेलो आहोत का, असा प्रश्नही अब्दुल्ला यांनी केला. (Farooq Abdullah on The Kashmir Files)
काश्मीरमध्ये अचानक काश्मिरी पंडितांवरील हल्ले वाढले आहेत. या पार्श्वभूमीवर नायब राज्यपालांच्या आदेशानुसार काश्मिरी पंडितांच्या घराबाहेर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.
या हल्ल्यादरम्यान रविवारी लष्कर-ए-इस्लामनेही धमकी दिली होती. काश्मिरी पंडितांनी खोरे सोडावे नाहीतर मरायला तयार व्हावे, अशी धमकी दिली होती.
पुलवामा येथील हवाल ट्रान्झिट निवासस्थानात राहणाऱ्या काश्मिरी पंडितांना ही धमकी देण्यात आली आहे. या ट्रान्झिट निवासस्थानात राहणारे बहुतेक काश्मिरी पंडित सरकारी नोकरी करतात. हवाल ट्रान्झिट हाऊसिंगच्या अध्यक्षांना उद्देशून हे पोस्टर आहे. (Farooq Abdullah on The Kashmir Files)
Edited By- Santosh Kanmuse
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.