Rahul Gandhi On Caste Census Saamtv
देश विदेश

Caste Census: 'आम्ही सत्तेत आलो तर देशात जातीनिहाय जनगणना करणार', MP निवडणुकीपूर्वी राहुल गांधींची मोठी घोषणा

Satish Kengar

Rahul Gandhi On Caste Census:

मध्य प्रदेशमध्ये या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या विधानसभा निवडणुकांपूर्वी काँग्रेस नेते राहुल गांधी मोठी घोषणा केली आहे. ते म्हणाले आहेत की, जर त्यांचा पक्ष केंद्रात सत्तेवर आला तर देशातील इतर मागासवर्गीय (ओबीसी) लोकांची नेमकी संख्या जाणून घेण्यासाठी जातीनिहाय जनगणना केली जाईल. तत्पूर्वी नितीश सरकारने बिहारमध्येही जातीनिहाय जनगणना केली आहे, ज्याची आकडेवारी अद्याप जाहीर झालेली नाही.

मध्य प्रदेशातील शाजापूर जिल्ह्यातील कालापिपल विधानसभा मतदारसंघात प्रचारादरम्यान राहुल गांधी, असं म्हणाले आहेत. यावेळी बोलताना ते म्हणाले, 'सत्तेवर आल्यानंतर लगेचच, देशातील ओबीसींची नेमकी संख्या जाणून घेण्यासाठी आम्ही सर्वप्रथम जातनिहाय जनगणना करू, कारण त्यांची नेमकी संख्या कोणालाच माहिती नाही.'

त्यांनी दावा केला आहे की, कॅबिनेट सचिव आणि सचिवांसह केवळ 90 अधिकारी देश चालवत आहेत. भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) खासदार आणि आमदारांची देशातील धोरणे आणि कायदे बनवण्यात कोणतीही भूमिका नाही.  (Latest Marathi News)

भाजपच्या निवडून आलेल्या सदस्यांऐवजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) सदस्य आणि नोकरशहा कायदे बनवत असल्याचा आरोप त्यांनी केला. मध्य प्रदेश हे देशातील भ्रष्टाचाराचे केंद्र असल्याचे सांगून राहुल म्हणाले, 'व्यापमसारख्या घोटाळ्यांनी राज्य हादरले आहे. महाकाल लोक कॉरिडॉरच्या बांधकामात एमबीबीएसच्या जागा विकल्या जातात, परीक्षेचे पेपर लीक होतात.'

18 वर्षांत 18 हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केली, राहुल गांधी यांचा दावा

मध्य प्रदेशात गेल्या 18 वर्षांत 18 हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला आहे. ते म्हणाले की, 'याचा अर्थ असा आहे की राज्यात दररोज तीन शेतकरी आपला जीव देतात.' राहुल गांधी पुढे म्हणाले, 'भारतात दोन विचारधारा कार्यरत आहेत - एक प्रेम, आदर आणि बंधुता, ज्याला काँग्रेसचा पाठिंबा आहे. तर दुसरी द्वेष आणि रागाची, ज्याला आरएसएस आणि भाजपचा पाठिंबा आहे.'

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sambhajinagar Corporation : पाणी पुरवठ्यासाठी करणार सौरऊर्जेचा वापर; शंभर एकर जागेवर संभाजीनगर महापालिका उभारणार प्रकल्प

Maggi Dosa Recipe : मुलांना टिफीनमध्ये द्या झटपट बनवलेला मॅगी डोसा; वाचा 5 मिनिटांत तयार होणारी रेसिपी

Maharashtra News Live Updates: पंतप्रधान मोदींचा आज वर्धा दौरा; असा असेल कार्यक्रम...

Palghar Crime: निर्मात्याकडून अश्लील मेसेज अन् छेडछाड; २६ वर्षीय अभिनेत्रीची पोलिसात तक्रार, मुंबईमधील धक्कादायक प्रकार

Bigg Boss Marathi : संग्रामला टोला, अरबाजचं तोंडभरून कौतुक; उत्कर्ष शिंदे काय म्हणाला ?

SCROLL FOR NEXT