IAS-IPS Shortage Saam Tv
देश विदेश

IAS-IPS Shortage: मोठी बातमी! देशात १३०० IAS तर ५०० IPS पदे रिक्त; केंद्रीय मंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती

IAS-IPS Shortage Vacancy 2026: देशात आयएएस आणि आयपीएस पदासाठी शेकडो रिक्त जागा असल्याची माहिती समोर आली आहे. यूपीएससीद्वारे भरण्यात येणाऱ्या या जागा रिक्त असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

Siddhi Hande

यूपीएससीमधील रिक्त पदांबाबत महत्त्वाची अपडेट

आयएएस, आयपीएस पदासाठी शेकडो जागा रिक्त

IAS साठी १,३०० पदे रिक्त

आयएएस आणि आयपीएस होण्याचे लाखो तरुणांचे स्वप्न असते. यासाठी तरुण दिवसरात्र मेहनत करतात. यूपीएससी परीक्षेत चांगली रँक प्राप्त करतात. त्यानंतर त्यांची आयएएस किंवा आयपीएस पदासाठी निवड होते. दरम्यान, आता आयएएस आणि आयपीएस पदांबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

आयएएस आणि आयपीएससाठी शेकडो रिक्त पदे

देशात आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांची कमतरता आहे. सरकारने लोकसभेत याबाबत आकडेवारी सादर केली. या आकडेवारीनुसार, आयएएस आणि आयपीएस पदासाठी शेकडो पद रिक्त आहेत. एवढ्या मोठ्या संख्येने पदे रिक्त असणे ही चिंतेंची बाब आहे. आयएएस आणि आयपीएस या अधिकाऱ्यांमुळेच देशात कायदा व सुव्यवस्था सुरळीत असते. परंतु आता हीच पदे रिक्त असल्याने सुरक्षेबाबत प्रश्न निर्माण झाले आहेत.

सरकारच्या माहितीनुसार,देशात एकूण ६,८७७ आयएएस पदे आहेत. यापैकी केवळ ५,५७७ पदे भरलेली आहेत. सुमारे १,३०० पदे रिक्त आहेत. तर एकूण ५०९९ आयपीएस पदे आहेत. त्यापैकी फक्त ४,५९४ पदे भरली आहेत. ५०५ पदे अजूनही रिक्त आहेत. याचा परिणाम थेट प्रशासन आणि पोलिस यंत्रणेवर होऊ शकतो.

मंत्री जितेंद्र सिंह यांनी दिली माहिती

राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी संसदेत याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी संसदे लेखी उत्तर दिले. यामध्ये सांगितले की, पदे भरण्याची प्रक्रिया सुरु आहे. दरवर्षी नागरी सेवी परिक्षेच्या माध्यमातून ही पदे भरली जातात. २०१२ पासून दरवर्षी एकूण १८० उमेदवारांची निवड केली जाते. यातील ४ टक्के जागा दिव्यांग उमेदवारांसाठी असतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhurandhar 2 OTT Release : 'धुरंधर 2'चा अनोखा अवतार पाहा मोबाइलवर; रणवीर घेऊन येतोय मोठा ट्विस्ट, ओटीटीवर कुठे अन् कधी पाहाल?

Maharashtra News Live Update: बोरामणी तिहेरी हत्याकांड प्रकरणातील मुख्य आरोपीला बांगलादेश सीमेवर सोलापूर पोलिसांनी पकडलं

राजकारणात खळबळ! शिंदेंच्या शिवसेना नेत्याला अटक; साक्षीदाराचे अपहरण करून खून केल्याचा धक्कादायक प्रकार

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी! eKYC साठी मुदतवाढ मिळण्याची शक्यता; सरकार मोठा निर्णय घेणार

Thalapathy Vijay CM oath : राजकारणात नवा ट्विस्ट! थलापती विजय यांचा शपथविधी रखडला; 'मॅजिक फिगर'साठी अजून २ आमदारांच्या पाठिंब्याची गरज

SCROLL FOR NEXT