ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय हवाई दलाचं मोठं यश.
पाच पाकिस्तानी एफ-१६ आणि जेएफ-१७ विमाने पाडली.
हवाई दल प्रमुख एपी सिंह यांनी खुलासा केला.
भारतीय हवाई दलाकडून (आएएफ) ९३ व्या हवाई सेना दिवस साजरा करण्यासाठी जय्यत तयारी सुरूय. यावेळी हवाई दल प्रमुख ए.पी. सिंह यांनी ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय हवाई दलाने केलेल्या कामगिरी माहिती दिली. भारतीय हवाई दलाने पाकिस्तानच्या F-16, JF-17 या लढाऊ विमानांना हाणून खाली पाडलं. दरम्यान वायुसेनेचे पीआरओ असलेले विंग कमांडर जयदीप सिंग यांनी पत्रकार परिषदेत याबद्दल संपूर्ण माहिती दिली.
या ब्रीफिंगमध्ये ऑपरेशन सिंदूरवर लक्ष केंद्रित करण्यात आलं. पहलगाम हल्ल्यानंतरची ही सर्वात महत्त्वाची कारवाई होती. विंग कमांडरने स्पष्ट केले की, सरकारने सैन्याला पूर्ण स्वातंत्र्य दिलं होतं. ऑपरेशन सिंदूरची हे इतिहासात नोंद होईल. कारण ते एकाच उद्दिष्टाने सुरू झाले होते आणि राष्ट्राने युद्धबंदीचा निर्णय घेतला. आमच्या शक्तीशाली एअर डिफेन्स सिस्टीमने पाकिस्तानचा सर्व खेळ उद्धवस्त करून टाकला.
लॉन्ग रेंज एमएएम क्षेपणास्त्रांनी शत्रूंना मागे ढकललं. सर्वात जास्त लांबीचं टार्गेट किल हे ३०० किमी पेक्षा जास्त होतं. याच इतिहासात नोंद होईल. आम्ही खूप अचूक हल्ला केले. आमचं किमी नुकसान झालंय. फक्त एका रात्रीत शत्रूंनी गुडघे टेकल्या, विंग कमांडर म्हणाले. १९७१ नंतर पहिल्यांदाच ऑपरेशन सिंदूरमध्ये अशा प्रकारची विनाशकारी कारवाई करण्यात आली.
हवाई दलाने त्यांची अचूकता, अभेद्यता आणि अचूकता सिद्ध केली. सर्व सैन्याने - हवाई, जमीन आणि नौदल - एकत्रितपणे ऑपरेशनचे नियोजन केले आणि ते अंमलात आणलं. विंग कमांडर म्हणाले की, चुकीची माहिती मोठ्या प्रमाणात पसरत असताना, आपल्या माध्यमांनी सशस्त्र दलांना मोठी मदत केली. जनतेचे मनोबल कमी होऊ नये यासाठी वाहिन्यांनी योगदान दिले. हवाई दलानं ऑपरेशन सिंदूरमधील हल्ल्यांचा व्हिडिओ प्रसारित केली.
त्यानंतर विंग कमांडर यांनी इशारा देताना सांगितलं की, पुढील युद्ध हे मागी यु्द्धांप्रमाणे होणार नाही. सध्याच्या आणि भविष्यातील युद्धांसाठी आपण तयार असले पाहिजे. जागतिक घडामोडींवर लक्ष ठेवले पाहिजे. २०४७ पर्यंत एक रोडमॅप तयार आहे, ज्याच्या केंद्रस्थानी स्वावलंबन (आत्मनिर्भर भारत) आहे. एलसीए मार्क-१ए साठी ऑर्डर देण्यात आल्या आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.