Mamata Banerjee  Saam Tv
देश विदेश

Partha Chatterjee: पार्थ चटर्जींवर मुख्यमंत्री ममता बॅनर्जींची कारवाई, मंत्रिमंडळातून हकालपट्टी

१०० कोटीपेक्षा जास्त प.बंगाल शिक्षक घोटाळा प्रकरणी अटकेत असलेले मंत्री पार्थ चॅटर्जी यांच्याविरोधात आता मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी कारवाई केली आहे.

साम वृत्तसंथा

नवी दिल्ली : १०० कोटीपेक्षा जास्त प.बंगाल शिक्षक घोटाळा प्रकरणी अटकेत असलेले मंत्री पार्थ चॅटर्जी यांच्याविरोधात आता मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी कारवाई केली आहे. पार्थ चटर्जी यांची पश्चिम बंगालच्या ममता सरकारकडून मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यांना तिन्ही मंत्रिपदावरून हटवण्यात आले आहे. अटक झाल्यानंतर सहा दिवसांनी ममता बॅनर्जी यांनी त्यांच्यावर कारवाई केली आहे.

दरम्यान, ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्याकडे आता पार्थ चटर्जी यांच्याकडे असणाऱ्या खात्यांची जबाबदारी असणार आहे. तृणमूल काँग्रेसचे सरचिटणीस आणि खासदार अभिषेक बॅनर्जी यांनी पार्थ चटर्जी यांच्या राजीनाम्याबाबत तृणमूल काँग्रेसमध्ये आवाज उठवण्यास सुरुवात झाली, त्यासंदर्भात एक महत्त्वाची बैठक घेतली.

मुख्यमंत्री बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी मंत्रिमंडळाची बैठक घेतली. या बैठकीत पार्थ चॅटर्जी यांच्या मंत्रीपदाचा मुद्दाही उपस्थित झाला. विशेष म्हणजे पार्थ चॅटर्जी यांच्याविरोधात पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनीच आवाज उठवला. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी याआधीच चटर्जींपासून दुरावले आहेत. तृणमूल काँग्रेसचे सरचिटणीस कुणाल घोष यांनी त्यांना मंत्रिमंडळासह सर्व पदांवरून हटवण्याची मागणी केली होती. TMC सरचिटणीस कुणाल घोष यांनी आज ट्विट केले. या ट्विटमध्ये 'पार्थ चटर्जी यांना मंत्रिपदावरून आणि पक्षाच्या सर्व पदांवरून तत्काळ हटवावे. त्यांची हकालपट्टी करावी, अशी मागणी त्यांनी ट्विटरवरुन केली होती.

पश्चिम बंगालमधील शिक्षक भरती घोटाळ्याप्रकरणी ईडीने (ED) अर्पिता मुखर्जींच्या चार ठिकाणांची झडती घेतली आहे. खोल्यांव्यतिरिक्त वॉश रुममध्येही रोकड लपवून ठेवली होती. आतापर्यंत ५३ कोटींहून अधिक रोकड आणि सोने, डॉलर आदी सापडले आहेत. हे पाहता हा घोटाळा १०० कोटींहून अधिक असण्याची भीती ईडीने व्यक्त केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vidhan Sabha Election Result : रायगड जिल्ह्यात महायुतीची सरशी; महाविकास आघाडीच्या हाती भोपळा

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: सांगलीत जिल्ह्यात कोण जिंकलं? वाचा एका क्लिकवर

Maharashtra Election Result: उल्हासनगरात राष्ट्रवादीला जबर धक्का! भाजपच्या कुमार आयलानींचा मोठा विजय

Sunil Tatkare: खरी राष्ट्रवादी कोणती? अखेर जनतेनं उत्तर दिलचं, सुनिल तटकरेची प्रतिक्रिया

Vidhan Sabha Election Result : अकोल्यात बंडखोरीचा भाजपला फटका; काँग्रेसचे साजिद खान पठाण विजयी

SCROLL FOR NEXT