PM Modi-bill gates interview
PM Modi-bill gates interview Saam tv
देश विदेश

PM Modi-bill gates : बिल गेट्स यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; नवीन तंत्रज्ञानाबाबत दोघांमध्ये चर्चा

Vishal Gangurde

PM Modi - Bill Gates Talk About Technology:

मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान दोघांनी नवी तंत्रज्ञानाबाबत दोघांमध्ये चर्चा केली. तसेच दोघांमध्ये आरोग्य, कृषी, हवामान बदलाविषयीही चर्चा झाली. 'मी तंत्रज्ञानाचा गुलाम नाही. पण लहान मुलांसारखं तंत्रज्ञान खूप आवडतं, असं नरेंद्र मोदी हे बिल गेट्स यांच्याशी चर्चा करताना म्हणाले. तसेच यावेळी मोदींनी गर्भाशयाच्या कर्करोगाच्या संशोधनासाठी २ लाख आरोग्य केंद्र बांधणार असल्याची माहिती दिली.

बिल गेट्स यांच्याशी चर्चा करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) म्हणाले की, 'मी तंत्रज्ञानाचा गुलाम नाही. मी पाण्याच्या प्रवाहासारखा नवनवीन टेक्निक शोधत असतो. मला तंत्रज्ञान नेहमी आकर्षित करतं. मी या क्षेत्रातील जाणकार नाही. पण मला या विषयाची लहान मुलांसारखी उत्सुकता असते'.

तसेच, 'माझं नवं सरकार गर्भाशयाच्या कर्करोगावर संशोधन करण्यासाठी शास्त्रज्ञांना निधी वाटप करेल, असेही त्यांनी सांगितलं. यावेळी तंत्रज्ञान हे कृषी, आरोग्य, शिक्षण क्षेत्रात महत्वाची भूमिका निभावेल, असंही मोदींनी सांगितलं.

हरित उर्जेवरही झाली चर्चा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिल गेट्स यांच्यावर हरित उर्जेवरही चर्चा केली. मोदी म्हणाले, 'मला सांगताना आनंद होत आहे की, भारत नवीकरणीय ऊर्जेमध्ये क्षेत्रामध्ये प्रगती करत आहे. आम्ही हरित हायड्रोजनमध्ये प्रगती करू इच्छित आहे. तमिळनाडूमध्ये मी हायड्रोजनने धावणारी बोट लाँच केली. या बोटचा मार्ग काशी ते अयोध्या ठेवण्याचा विचार करत आहे. तसेच माझं 'स्वच्छ गंगा' हे आंदोलन लोकांमध्ये पसरत आहे. या आंदोलनामुळे लोकांमध्ये चांगला संदेश पसरत आहे'.

स्टॅच्यू ऑफ युनिटीची चर्चा

बिल गेट्स यांना सांगताना पंतप्रधान मोदी म्हणाले, 'मी भारतातील ६ लाख गावांतील शेतकऱ्यांकडून लोह गोळा केलं. या लोहाला वितळलं. त्यानंतर या लोहाचा उपयोग 'स्टॅच्यू ऑफ युनिटी'मध्ये वापर केला. तसेच मी प्रत्येक गावातून माती आणली, त्यापासून 'युनिटी वॉल' तयारी केली. यामागे एकतेची भावना आहे'.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Breaking News: इराणच्या ताब्यातून ५ भारतीय खलाशांची सुटका; भारताच्या परराष्ट्र नीतीचं मोठं यश

Sharad Pawar News | राष्ट्रवादी पक्षाच्या विलीनकरणावर शरद पवार यांचे मोठे विधान

Health Tips: महिनाभर लसून कांदा नाही काल्यास शरीरात दिसतील 'हे' बदल

Interesting Fact: भारतातील या गावात चपला घालण्यास बंदीच; पाहुण्यांसाठी खास नियम

Today's Marathi News Live : जुन्नरमध्ये महिलेची बिबट्याने केली शिकार; आठ दिवसात दुसरी घटना

SCROLL FOR NEXT