Today's Marathi News Live : नवी मुंबईत भाजप आणि शिवसेनेत दुरावा कायम, सूत्रांची माहिती

Maharashtra Chya Tajya Marathi Batmya Live (10 may 2024): लोकसभा निवडणूक, महाराष्ट्रातील महत्वाच्या घडामोडी, देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी, राजकीय घडामोडी लाईव्ह अपडेट वाचा एका क्लिकवर
10 May 2024 Latest Updates  PM Narendra Modi and Sharad pawar  overall Maharashtra
10 May 2024 Latest Updates PM Narendra Modi and Sharad pawar overall MaharashtraSaam TV

नवी मुंबईत भाजप आणि शिवसेनेत दुरावा कायम, सूत्रांची माहिती

शिवसेना, भाजप संयुक्त बैठकीला भाजपचा विरोध

शिवसेना आणि भाजपची संयुक्त बैठक अजून नाही

नरेश म्हस्केसाठी भाजपने बोलावली स्वतंत्र कार्यकर्त्यांची बैठक

उद्या सकाळी वाशीत भाजपची स्वतंत्र बैठक

बैठकीला ठाण्यातील शिवसेनेचे नेते उपस्थित राहणार

मात्र नवी मुंबईतील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना निमंत्रण नाही

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर ७.४४ कोटी रुपयांचं सोनं जप्त

मुंबई कस्टम्स विभागाची कारवाई

एकूण १८ केसेसमध्ये ११.६२ किलो सोन जप्त

सोन्याचे दागिने, विटा, सोन्याची पूड , सोन्याचं मेण स्वरूपात केली जात होती सोन्याची तस्करी

परदेशी नागरिकांसह एकूण सात प्रवाश्यांना करण्यात आली अटक

गुदद्वार तसेच अंतर्वस्त्र, कपडे आणि बुटात लपवून केली जात होती सोन्याची तस्करी

१२ लाख रुपयांची रोकड देखील करण्यात आली जप्त

ही लढाई देशासाठी; उद्धव ठाकरे जालन्यातून कडाडले

ही लढाई देशासाठी आहे. म्हणून मी जमलेल्या तंमाम देशभक्तांनो म्हणालो.

आज दुपारी मी जालन्याला जाणार होतो. पण हेलिकॉप्टर खराब हवामानामुळे जाणार नसल्याचे पायलट ने सांगितले.

जालन्यात आयुष्यातील २५ वर्ष एका व्यक्तीला निवडून देता. पण मी बातमी वाचली की मतदान कार्ड कचऱ्यात सापडले. मला वाटले की लोक म्हणतायत मतदान कशाला करायचे?

कागलमध्ये वीज अंगावर कोसळून ६ जण जखमी

कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथे वीज कोसळली

वीज कोसळून 6 व्यक्ती झाल्या जखमी

कोल्हापूरातील सीपीआर मध्ये तीन व्यक्ती उपचारासाठी सुरू

दुपारी कोल्हापूर जिल्ह्यातील विविध भागात झाला मुसळधार पाऊस

नांदेडमध्ये कार पुलावरून थेट नदीत कोसळली, दोघांचा मृत्यू

नांदेडमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. कार पुवावरून जात असताना थेट नदीत कोसळली असून दोघांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

नाशिक जिल्ह्याला अवकाळीचा तडाखा, कांदा उत्पादकांची वाढली चिंता

नाशिक जिल्ह्यात आज अनेक तालुक्यातील काही भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावल्याने बळीराजा चांगलाच धास्तावला आहे,अनेक शेतकऱ्यांनी उन्हाळी कांदा काढून चाळीत साठवला असून पावसामुळे तो खराब तर होणार नाही ना अशी धास्ती शेतकऱ्यांच्या मनात असून आज झालेल्या वादळी वाऱ्याने मात्र काही ठिकाणी घरांचे पत्रे उडाली तर कानमंडाळे येथे वीज पडून ऐका शेतकऱ्याचा बैल मृत झाला आहे

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची उद्या पत्रकार परिषद

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची उद्या पत्रकार परिषद

उद्या दुपारी १ वाजता पत्रकार परिषद

काहीच वेळापूर्वी केजरीवाल यांची तुरुंगातून झाली आहे सुटका

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील दिंडी प्रमुख ह.भ.प. अप्पासाहेब महाराज राशिनकर यांचं निधन

वारकरी संप्रदायातून एक दुखःद बातमी आहे. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील दिंडी प्रमुख व पंढरपूर येथील राशिनकर फडाचे प्रमुख ह.भ.प.अप्पासाहेब राशिनकर यांचे आज वयाच्या 79 व्या वर्षी निधन झाले. ते गेल्या अनेक दिवसांपासून आजारी होते. ज्ञानेश्वरी ग्रंथाचे ते गाढे अभ्यासक होते. त्यांनी अनेक वर्षे ज्ञानेश्वर ग्रंथाचे पारायण केले. त्यांच्यावर आज येथील वैकुंठ स्मशानभूमीत अत्यंत संस्कार करण्यात आले. राशिनकर महाराज यांचा महाराष्ट्रात अनेक ठिकाणी शिष्यगण आहे. त्यांच्या निधनाने वारकरी संप्रदायामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

पहिल्यांदा निर्यातीवर 40% कर लावला, निर्यात बंद केली: जयंत पाटलांचा आरोप

पहिल्यांदा 40% निर्यातीवर कर लावला एक्सपोर्ट ड्युटी नंतर निर्यात बंद केली निर्यात बंद केल्यानंतर नगर नाशिक जळगाव या भागात त्यांच्या उमेदवारांना फिरणं मुश्कील व्हायला लागले ज्यावेळी या सगळ्या उमेदवारांनी फोन करून सांगितलं आमच्यावर आता कांदा मारायचेच लोक बाकी राहिलेले शेतकरी याचा कांदा फेकून मारतील कृपा करून काहीतरी निर्णय करा त्यावेळी त्यांनी पहिला निर्णय केला गुजरातचा 2018 दिसला नाही महाराष्ट्राबद्दल एवढी असूया का आहे समजत नाही

उद्धव ठाकरे उद्या पालघर लोकसभा मतदारसंघाचा करणार दौरा

पालघर मधील विविध शिष्ट मंडळांना, मुस्लिम संघटनांना शिवाय वाढवण बंदर विरोधी संघटनांच्या उद्धव ठाकरे भेटी घेणार आहेत

पालघर मधील जल देवी रिसॉर्ट या ठिकाणी उद्धव ठाकरे विविध बैठका उद्या पालघर लोकसभा मतदारसंघात घेणार आहेत

उद्धव ठाकरे उद्या सकाळी 11 वाजता पालघर येथे पोहोचतील... साधारणपणे चार वाजेपर्यंत या बैठका

तर 14 मेला उद्धव ठाकरे यांची पालघर मध्ये जाहीर सभा होणार आहे

शिर्डीसह उत्तर नगर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस

नगर जिल्ह्यात सर्वदूर अवकाळी पावसाची हजेरी.

शिर्डीसह उत्तर नगर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस.

अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची उडाली धांदल.

वातावरणात गारवा निर्माण झाल्याने उकाड्यापासून दिलासा.

मात्र कांदा उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली.

करवीर निवासिनी अंबाबाईला खास आंब्याची आरास

आज अक्षय तृतीया निमित्त श्री करवीर निवासिनी अंबाबाई देवीची आकर्षक पूजा बांधण्यात आली आहे. देवीला खास आंब्याची आरास करण्यात आली असून यामध्ये तब्बल 100 डझन आंबे वापरण्यात आले आहेत. आंब्याच्या आरासमुळे देवीचे सौंदर्य आणखी खुलून आले आहे. देवीचे हे मनमोहक रूप पाहण्यासाठी भाविकांनी मंदिरात गर्दी केली आहे.

राज्यात आचारसंहिता लागू झाल्यापासून सीआरपीसी काद्याअंतर्गत 1,22,834 जणांवर प्रतिबंधात्म कारवाई

निवडणूक दरम्यान कायदा आणि सुव्यवस्था बाबत उचललेले पाऊल

राज्यात एकूण शस्त्र परवाने : 74460

जमा करण्यात आलेले शस्त्र : 50831

जप्त करण्यात आलेली शस्त्र :237

जप्त अवैध शस्त्र :1851

परवाने रद्द करून जप्त केलेकी शस्त्र: 1132

परवाना जमा करण्यापासून दिलेली सुट : 17676

राज्यात आचार संहिता लागू झाल्या पासून सीआरपीसी काद्याअंतर्गत प्रतिबंधात्म कारवाई केलेल्यां इसमांची संख्या : 1,22,834

एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा

कायम जामीन केला मंजूर

हायकोर्टाने सुनावलेल्या आदेशावर व्यक्त केलं आश्चर्य

मुंबई उच्च न्यायालयानं दिलेल्या शिक्षेविरोधात प्रदीप शर्मा यांनी मागीतली होती दाद

प्रदीप शर्मा यांच्या जामीन आणि स्थगीती मागणीवर झाली सुनावणी

प्रदीप शर्मा यांना मुंबई पोलिसांकडे सरेंडर होण्याची अट केली रद्द

सर्वोच्च न्यायालयानं डबल बेंचने दीले आदेश

सात दिवसात जामीन प्रक्रिया पुर्ण करा

मुंबई सत्र न्यायालयाला दीले आदेश

न्यायमूर्ती ऋषिकेश रॉय, न्यायमूर्ती प्रशांत मिश्रा यांच्या द्विसदस्य पिठाचा निर्णय

एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदिप शर्मा यांना लखनभैय्या हत्या प्रकरणात,सेशन कोर्टानं केली होती निर्दोश मुक्तता

मात्र, उच्च न्यायालयानं हा निकाल फिरवून प्रदीप शर्मा यांना ठरवलं होतं दोषी

अरविंद केजरीवाल यांच्या अंतरिम जामिनासाठी सुप्रीम कोर्टाने घातलेल्या अटी

अरविंद केजरीवाल मुख्यमंत्री कार्यालय आणि दिल्ली सचिवालयात जाणार नाहीत

आवश्यक असल्याशिवाय कोणत्याही फाईलवर सही करणार नाही, म्हणजेच फाईल खूप महत्त्वाची असल्यास त्यावर सही करू शकतात

सही केलीच तर लेफ्टनंट गव्हर्नरच्या परवानगीशिवाय कोणत्याही फाईलवर स्वाक्षरी करणार नाहीत

दिल्ली दारू धोरण प्रकरणातील त्यांच्या भूमिकेवर वक्तव्य करणार नाहीत

कोणत्याही साक्षीदारांशी संपर्क साधणार नाही

उद्धव ठाकरे यांचा आजचा जालना जिल्ह्याचा दौरा रद्द

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज जालना जिल्ह्याचा दौरा रद्द.

जालना जिल्ह्यात पाऊस पडत असल्यामुळे हवामान खराब झाले आहे…. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव हेलिकॅाप्टर उड्डाण करून शकत नाही.

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे छत्रपती संभाजी नगरहून हेलिकॅाप्टरने जालना लोकसभा मतदार संघातील महाविकास आघीडीचे उमेदवार कल्याण काळे यांच्या प्रचारासाठी जालना येथे जाणार होते.

मतदानात तफावत असल्याचा आरोप निवडणूक आयोगाने फेटाळला

निवडणूक आयोगच काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या पत्राला उत्तर

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी मतदारांच्या संख्येवर उपस्थित केलेल्या प्रश्नांना दिली उत्तर

अद्ययावत डेटा हा मतदान झाल्यानंतर जाहीर केला जातो, २०१९ ला देखील असाच तो जाहीर केला होता

असे आरोप करून त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रक्रियेवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला आहे - निवडणूक आयोग

निवडणुकीच्या मध्यावर असे आरोप केल्याने जनतेमध्ये संभ्रम निर्माण होतो आणि निष्पक्ष निवडणुकांच्या प्रक्रियेत अडचणी निर्माण होतात - निवडणूक आयोग

उशिरा आकडेवारी जाहीर केली म्हणून खरगे यांनी उपस्थित केले होते अनेक प्रश्न

पुण्यातील शरद पवारांची सभा रद्द, पावसामुळे सभास्थळी साचलं पाणी

पुण्यात होणारी महाविकास आघाडीची सभा अखेर रद्द

पुण्यातील वडगाव शेरी भागात आज शरद पवार आणि आदित्य ठाकरे यांची एकत्रित सभा होणार होती

मात्र दुपारी आलेल्या पावसाने सभास्थळी मोठं पाणी जमा झालं आहे

यामुळे आयोजकांनी ही सभा रद्द करण्याचा निर्णय घेतला

नाशिक मुंबई महामार्गावर उत्तर महाराष्ट्र केसरीची गोळ्या झाडून हत्या

- नाशिकजवळ उत्तर महाराष्ट्र केसरीची हत्या

- नाशिक मुंबई महामार्गावर करिश्मा ढाब्याजवळ भूषण लहामागेची हत्या

- गाडीतून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी भूषण लहामगेवर झाडल्या गोळ्या

- नाशिक मुंबई महामार्गावर भर दिवसा हत्येचा थरार

- पूर्व वैमनस्यातून हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी अवकाळीचा तडाखा

कन्नड तालुक्यात पाऊस; पिशोर परिसरात अडीच वाजेपासून पिशोर येथे मध्यम ते तुरळक स्वरूपात पाऊस. सुरुवातीला जोरदार वारे. अद्याप तुरळक पाऊस सुरू

खुलताबद,वेरुळ परिसरात वारयासह पावसाला सुरुवात

चित्तेपिंपळगाव परिसरात जोरदार वादळी वारे वाहू लागले असून पावसाला सुरूवात झाली आहे

फुलंब्री परिसरात वीजेच्या कडकडाटासह अर्धा तास जोरदार पाऊस.

उत्तर पुणे जिल्ह्यात आवकाळी पाऊसाच्या सरी, वातावरणात काहीसा गारवा

मागच्या काही दिवसांपासून उन्हाचा कडाका वाढत असल्यामुळे अंगाची लाही होत होती. यामुळे माणसांसह पाळीव प्राणी जंगली प्राणी हैरान झाले होते. अशात आज अचानक पावसाचे आगमन झाल्याने वातावरणात काहीसा गारवा निर्माण झाला आहे. तर दुसरीकडे उन्हाळी बाजरीचे काही प्रमाणात नुकसान होण्याची भीतीही व्यक्त होत आहे.

अजूनही लोकशाही भक्कम, अरविंद केजरीवाल यांच्या जामीनानंतर शरद पवार यांची प्रतिक्रिया 

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या अंतरिम जामीन आदेशाचं शरद पवार यांनी स्वागत केलं आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे देशात आजही लोकशाही मूल्ये जीवंत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

उद्धव ठाकरे यांच्यामुळे अभिनेता गोविंदाला थांबवं लागलं हॉटेल बाहेर

छत्रपती संभाजीनगरमध्ये नुकताच शिवसेनेत प्रवेश केलेल्या अभिनेता गोविंदाला उद्धव ठाकरे यांच्यामुळे २० मिनिटे हॉटेलबाहेर थांबावं लागलं. गोविंदाला त्याच्या रूम पर्यंत पोहचवण्यासाठी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना चांगलीच धावपळ करावी लागली. काल रात्रीपासून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे हॉटेल रामामध्ये मुक्कामी आहेत.

शाळकरी मुलीशी अश्लील चाळे करणाऱ्या ऑटो चालकाला अटक

नागपुरात धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अल्पवयीन मुलींला शाळेत सोडणाऱ्या ऑटो चालकानेच चक्क त्या चिमुकलीसोबत अश्लील चाळे केल्याचा व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हारल होत समोर आला. यात प्रकरणाची संवेदनशीलता लक्षात घेत पोलिसांनी सुमोटो गुन्हा दाखल करत ऑटो चालकाला अटक केली.

कोल्हापूर परिसरात पावसाची हजेरी, उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना थोडासा दिलासा

कोल्हापुरातील उपनगरं आणि ग्रामीण भागात पावसाची हजेरी

उकाड्याने हैराण झालेल्या कोल्हापुरकरांना थोडासा दिलासा

गेले महिनाभर कोल्हापूरचा पार 40 ℃ च्या वर

कोल्हापूर शहरात ढगाळ वातावरण

पाण्यासाठी भर उन्हाळ्यात आदिवासी बांधवांचं उपोषण

यवतमाळच्या पुसद तालुक्यातील शिळोना इंथे जलजीवन मिशनअंतर्गत विहिर खोदण्यात येणार आहे. या विहिरीसाठी जागा पाथरवाडी तलावा ऐवजी भरपूर पाण्याचा स्तोत्र असलेल्या जांब नाला प्रकल्पाजवळ देण्यात यावी या प्रमुख मागणीसाठी आदिवासी बांधवांनी भर ऊन्हाळ्यात उपोषण सुरू केलं आहे. केंद्र शासनाच्या महत्त्वाकांशी जलजीवन मिशन योजनेच्या निधी व्यर्थ जाऊ नये व शिळोणा ग्रामपंचायतीला दीर्घकालीन स्तोत्र पाणीपुरवठा व्हावा अशी मागणी उपोषणकर्त्यांनी केली असून गेल्या चार दिवसांपासून हे उपोषण सुरू आहेत.

वाळवा तालुक्यातील कुरळप परिसरात गारपिटीसह पाऊस

विजांच्या कडकडासह आणि वादळी वादळासह वीस मिनिटे झाला गाराचा पाऊस झाला

गारपिटीमुळे या परिसरातील आंबा , भाजीपाला पिकाचे नुकसान

पुढचे ३ तास पश्चिम महाराष्ट्र, नाशिक, अहमदनगर, संभाजीनगर जिल्ह्यात अवकाळी पावसाचा इशारा

वीजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यांसह सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे, अहमदनगर, नाशिक, छ. संभाजीनगर जिल्ह्यात अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

praful patel : प्रफुल पटेल यांनी घेतली खासदारकीची शपथ

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते प्रफुल पटेल यांनी घेतली खासदारकीची शपथ

राज्यसभा सभापती जगदीप धनखड यांनी दिली पटेल यांना शपथ

प्रफुल पटेल यांनी मराठीत घेतली शपथ

Raigad Fire News : रायगडमध्ये केमिकल कंपनीला भीषण आग

रायगड जिल्ह्यातील पाताळगंगा MIDC मध्ये केमिकल कंपनीला आग

आग आणि धुराचे लेळ परिसरात पसरल्याने घबराट

राज्यातील विविध जिल्ह्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाने वर्तवला अंदाज

राज्यातील विविध जिल्ह्यात विजा, वादळी वाऱ्यांसह काही ठिकाणी पावसाची शक्यता. जिल्हे: सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे, अहमदनगर, नाशिक, छ. संभाजीनगर या भागात पाऊस होण्याची शक्यता आहे.

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील निकालाचं स्वागत - CM शिंदे

नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्या प्रकरणात लागलेल्या निकालाचे स्वागत करतो, मुख्यमंत्र्यांची नंदुरबार येथे प्रतिक्रिया

गेल्या दहा वर्षापेक्षा अधिक काळापासून या प्रकरणांमध्ये न्याय अपेक्षित होता.

दाभोळकर कुटुंबाला कुठलीही मदत लागल्यास सरकार करणार मदत, मुख्यमंत्र्यांची ग्वाही

Mumbai News : मुंबई शिक्षक मतदारसंघावर ३ पक्षांचा दावा

मुंबई शिक्षक मतदारसंघावर तीन पक्षांनी दावा केला आहे.

सध्या समाजवादी गणराज्य पक्षाचे कपिल पाटील मुंबई शिक्षक मतदारसंघाचे आमदार

तर काँग्रेस आणि ठाकरे गटाकडूनही या मतदारसंघावर दावा

ठाकरे गटाकडून माजी शिक्षक अधिकारी ज.मो.अभ्यंकर आणि काँग्रेसकडून प्रा.प्रकाश सोनवणे संभाव्य उमेदवार

कपिल पाटील यांच्या समाजवादी गणराज्य पक्षाचे सुभाष किसन मोरे यांचे नाव अग्रेसर

Dindori Lok Sabha : शरद पवार गटाच्या बैठकीत नरहरी झिरवळ? फोटो सोशल मीडियावर व्हायरल

- दिंडोरी लोकसभा मतदारसंघात महायुतीला मोठा धक्का ?

- अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नरहरी झिरवळ शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या बैठकीत

- नरहरी झिरवळ दिंडोरीचे महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे यांच्या प्रचार बैठकीत उपस्थित

- नरहरी झिरवळ यांचा प्रचार बैठकीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल

डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणाच्या निकालाविरुद्ध उच्च न्यायालयात जाणार - हमीद दाभोलकर

डॉ. नरेंद्र दाभोलकर खटल्यात दोन आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. ही समाधानाची बाब आहे. पण मुख्य सूत्रधारांचा शोध घेण्यात तपास यंत्रणा अपयशी ठरल्या आहेत. मी अजूनही निकालपत्र वाचलेले नाही. पुण्याच्या विशेष न्यायालयाने दिलेल्या निकालाच्या विरुद्ध उच्च न्यायालयात अपील करणार असल्याची माहिती हमीद दाभोलकर यांनी दिली.

Mumbai Goa Highway Accident : मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघातात तीन ठार, दोघे गंभीर

मुंबई गोवा महामार्गावर पोलादपूर नजीक भीषण अपघात

कारची ट्रेलरला मागून धडक

अपघातात कारमधील तीन जण जागीच ठार, तर दोघे गंभीर

मुंबईहून कोकणात जाणाऱ्या मार्गीकेवर झाला अपघात

अपघातामुळे बराच काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळित

पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने केले मदतकार्य

पाऊण तासानंतर वाहतूक पूर्ववत करण्यात यश

भुजबळ फार्मवर शांतिगिरी महाराज आणि छगन भुजबळ यांची भेट

- शांतिगिरी महाराज छगन भुजबळांच्या भेटीला

- भुजबळ यांचं निवासस्थान असलेल्या भुजबळ फार्मवर शांतिगिरी महाराज आणि छगन भुजबळ यांची भेट

- झालं का नाही शांतिगिरी महाराज अपक्ष लढवतायेत नाशिकमधून निवडणूक

- महायुतीच्या नेत्यांकडून शांतिगिरी महाराजांची मनधरणी करण्याचे प्रयत्न ठरले होते निष्फळ

- आज शांतिगिरी महाराज आणि भुजबळांमध्ये नेमकी काय चर्चा होतेय हे पाहणं ठरणार महत्त्वाचं

डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणी अंदुरे, कळसकर यांना जन्मठेप

डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणी आज, शुक्रवारी निकाल लागला. कोर्टानं सचिन प्रकाशराव अंदूरे आणि शरद भाऊसाहेब कळसकर यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. पुराव्याअभावी इतर तिघांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. आरोप सिद्ध झालेल्या कळसकर आणि अंदुरे यांना जन्मठेप आणि पाच लाख रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.

डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणाचा ११ वर्षांनंतर निकाल; तावडे, भावे आणि पुनाळेकर निर्दोष

डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणाचा ११ वर्षांनंतर निकाल लागला

या प्रकरणात तिघे निर्दोष, तावडे, भावे आणि पुनाळेकर निर्दोष

दोघांवर गुन्हा दाखल

 अक्षय्य तृतीयाला सोने भाव खाणार, खरेदीत २० टक्के वाढीचा अंदाज

अक्षय्य तृतीयाच्या दिवशी सोने खरेदीला अधिक महत्त्व असतं. यंदा अक्षय्य तृतीयाला सोने भाव खाऊन जाणार आहे. सोन्याच्या दरात चार हजार रुपयांची भाव घसरण दिसतंय. त्यामुळे यंदा सोने खरेदीत २० टक्के वाढीचा अंदाज आहे. आज सोन्याच्या भाव ७३ हजारांवर आहे.

Junnar News : जुन्नरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू; आठ दिवसात दुसरी घटना

जुन्नर तालुक्यातील पिंपरी पेंढार येथे बिबट्याच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू

बाजरीच्या शेतात राखण्यासाठी गेलेल्या महिलेवर बिबट्याचा हल्ला

बिबट्याच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू

जुन्नरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात आठ दिवसात दुसरी घटना

Nanded News : नांदेडमध्ये खासगी कंपनीच्या ३ शाखा आणि चालकाच्या घरावर छापे

:- नांदेड शहरातील शिवजीनगर भागात आयकर विभागाचे छापे टाकण्यात आले.

चार ते पाच ठिकाणी छापे .

एका खाजगी फायनान्स प्रायव्हेट लिमिटेडच्या तीन शाखा आणि चालकाच्या घरावर छापे .

सकाळपासून झाडाझडती सूरू

lok sabha : वाराणसीतून काँग्रेस नेते अजय राय अर्ज दाखल करणार

वाराणसी लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेस उमेदवार आज अर्ज दाखल करणार

उत्तर प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अजय राय आज आपला अर्ज दाखल करणार

वाराणसी लोकसभा मतदार संघासाठी शेवटच्या म्हणजे सातव्या टप्प्यात निवडणूक होणार आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वाराणसी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत

अर्ज भरताना काँग्रेसकडून शक्तिप्रदर्शन केल जाणार

Pune News : पुण्यात पाऊस आणि वादळामुळे झाडपडीच्या 21 घटना

पाऊस आणि वादळामुळे पुण्यात झाडपडीच्या 21 घटना

शहरातील अनेक ठिकाणी झाडपडी

झाडपडीमुळे शहरात अनेक ठिकाणी चारचाकी वाहनांची मोठे नुकसान

कल संध्याकाळी शहरात झालेल्या अवकाळी पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडपडीच्या घटना

शहरातील सहकार नगर ,पद्मावती ,मॉडेल कॉलनी, शिवणे आणि कोथरूडमध्ये झाडपाडीच्या घटना

Dharashiv News : धाराशिव जिल्ह्यात पाणी टंचाईची तीव्रता वाढली

धाराशिव : जिल्ह्यात उन्हाची तिव्रता अधिकच वाढत आहे. त्यामुळे पाणीटंचाई झळा तीव्र झाल्याची परिस्थिती पाहायला मिळत आहे. पावणेपाचशे गावांमध्ये पाण्यासाठी ठणठणाट पाहायला मिळत आहे. तर प्रशासनाकडून 404 वाडी,वस्त्यांसह लहान मोठ्या गावांसाठी 648 जलस्रोताचे अधिग्रहण करण्यात आले आहे, तर 76 गावांना 117 टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

vegetable price hike : एपीएमसी बाजारपेठेत आवक घटली; भाजीपाल्याच्या दरात मोठी वाढ

नवी मुंबई : एपीएमसी भाजीपाला मार्केटमध्ये आवक घटली आहे. यामुळे भाजीपाल्याचे दर वधारले आहेत. उष्णतेमुळे एपीएमसी मार्केटमध्ये केवळ 500 गाड्या भाजीपाल्याची आवक होत आहे. तसेच गरमीमुळे भाजीपाला खराब देखील होत आहे. याचा परिणाम भाजीपाल्याच्या दरावर झाला आहे. भाजीपाल्याचे दर दहा टक्क्याने भाव वाढले आहे

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.