Stray Dogs On Street saam tv
देश विदेश

Shocking News :गाढ झोपेत असताना झोपडीतून खेचून नेलं, भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात १ वर्षीय बाळाचा मृत्यू

Hyderabad Shocking News: हैदराबादमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. हैदरबादमध्ये भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात एक वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे. या घटनेने चिमुकल्याच्या कुटुंबियांवर दुः खाचा डोंगर कोसळला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Hyderabad Stray Dog Attack On 1 Year Child:

हैदराबादमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. हैदरबादमध्ये भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात एक वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे. या घटनेने चिमुकल्याच्या कुटुंबियांवर दुः खाचा डोंगर कोसळला आहे.

हैदराबादमध्ये मध्यरात्री एका झोपडीत झोपलेल्या एक वर्षीय मुलावर कुत्र्यांनी हल्ला केला आहे. रात्री झोपेत असताना मुलाला झोपडीतून खेचत बाहेर नेले. त्यानंतर त्याच्यावर हल्ला केला. यात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यानंतर स्थानिक लोकांच्या ही गोष्ट लक्षात आल्यावर तातडीने ही माहिती पोलिसांना दिली. (latest News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, के नागराजू असे मृत मुलाचे नाव आहे. तर के सुर्यकुमार असे त्याच्या वडिलांचे नाव आहे. या घटनेनंतर के सुर्यकुमारने पोलिसांत तक्रार दाखल केली. या प्रकरणाचा तपास सध्या सुरू आहे. या घटनेने परिसरातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

के सुर्यकुमार हा शमशाबाद शहरात राजीव गृहप्रकल्प कॉम्प्लेक्सजवळ एका झोपडीत राहतो. तो मजूर म्हणून काम करायचा. बुधवारी रात्री तो त्याचा एक वर्षाचा मुलगा आणि २० वर्षांचा लहान मुलगा झोपडीत झोपले होते. तेव्हा ही घटना घडली.

बुधवारी रात्री दीड वाजता भटक्या कुत्र्यांचा जमाव एका लहान मुलाजवळ उभे होते. त्याच्यावर हल्ला करत होते. हे स्थानिकांनी पाहिले. त्यानंतर त्यांनी सुर्यकुमारला उठवले. त्यावेळी के नागराजू मृत अवस्थेत सापडला. याप्रकरणी पोलिस तपास करत आहेत.

याआधीही मागील वर्षी फेब्रुवारी महिन्यात अंबरपेठ येथे एका चार वर्षाच्या मुलावर भटक्या कुत्र्याने हल्ला केला होता. त्यात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. तसेच मागील काही दिवसांत भटक्या कुत्र्यांचा वावर वाढत आहे. भटक्या कुत्र्यांना लहान मुलांवर हल्ला केल्याच्या घटना वाढल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पत्नीवर अनैतिक संबंधाचा संशय, पती अन् मित्राकडून आळीपाळीनं बलात्कार; नंतर हात पाय बांधून नदीत फेकून दिलं

Aneet Padda : 'सैयारा'च्या यशानंतर अनीत पड्डाला लागला जॅकपॉट, मिळाली मोठ्या प्रोजेक्टची ऑफर

Maharashtra Live News Update : कोकांटेंचा राजीनामा नाहीच, फक्त खाते बदल होणार,सूत्रांची माहिती

Aadhar Card Link असतानाही मोबाईल नंबर बंद झाला? अपडेटसाठी लागतील फक्त ५ मिनिट, कोणत्या झंझटशिवाय होणार काम

Super Earth discovery: नासाने शोधला Super-Earth! पृथ्वीपेक्षा 36 पट मोठा आहे ग्रह; वाचा शास्त्रज्ञांनी कसा शोधला?

SCROLL FOR NEXT