Uttar Pradesh Crime News Saam TV
देश विदेश

नवऱ्याने कपाटात ठेवलेली दारू बायकोनं संपवली; त्यानंतर घडलं भयंकर

याप्रकरणी पोलिसांनी आरोपी नवऱ्याला अटक केली आहे.

Satish Daud

उन्‍नाव : नवरा-बायकोमध्ये (Husband-Wife) अनेकदा वेगवेगळ्या कारणावरून भांडणं होतात. अनेकदा हे वाद विकोपाला जातात. त्यानंतर मात्र विपरित (Crime) घडतं. असाच एक प्रकार उत्तरप्रदेशातून (Uttar Pradesh) समोर आला आहे. उत्तरप्रदेशातील उन्नाव शहरात नवरा आणि बायकोमध्ये विचित्र कारणावरून वाद झाला. घरात स्टॉक करून ठेवलेली दारू बायकोने संपवली म्हणून नवऱ्याने चक्क बायकोचा काटा काढला. मृतदेहाची विल्हेवाट लावत असताना पोलिसांनी त्याला अटक केली. (Uttar Pradesh Crime News)

नेमकं काय घडलं?

उत्तरप्रदेशातील उन्नाव शहरातील प्रेमनगर परिसरातून हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. नवऱ्याने घरात स्टॉक करून ठेवलेली दारू बायकोनं संपवली. ही गोष्ट लक्षात येताच नवऱ्याने बायकोला बेदम मारहाण केली. या मारहाणीत बायकोचा मृत्यू झाला. बायकोच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा नवऱ्याचा प्रयत्न होता. मात्र पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या.

योगेंद्र तिवारी असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तर पिंकी गुप्ता असं मृत महिलेचं नाव आहे. प्राप्त माहितीनुसार, योगेंद्र आणि पिंकीचा ५ वर्षापूर्वी विवाह झाला होता. योगेंद्र हा रिक्षा चालक असून तो प्रेमनगर येथील गौसिया मशिदीजवळ राहतो. (Uttar Pradesh Unnav News)

शुक्रवारी रात्री कामावरून योगेंद्र उशीरा घरी पोहचला. यावेळी दारू पिण्यासाठी त्याने घरातील कपाट उघडलं. तेव्हा कपाटात ठेवलेल्या दारूच्या बाटल्या त्याला रिकाम्या दिसल्या. यावरून पिंकीला विचारलं असता, सगळी दारू मी पिऊन टाकली असल्याचं तिनं कबूल केलं.

दरम्यान, दोघांमध्ये जोरदार भांडण झालं. रागाच्या भरात योगेंद्र याने पिंकीला बेदम मारहाण केली, त्याने पिंकीचे डोकं भिंतीवर आपटले. यात तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि त्यातच तिचा मृत्यू झाला. योगेंद्र याने पिकींच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्याला अटक केली. या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

देवेंद्र फडणवीस पंतप्रधान व्हावेत! राज्यातील बड्या नेत्याची इच्छा; राजकीय चर्चांना उधाण

बदल्यांचा धडाका सुरूच! 31 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; पोलिस दलात मोठी खळबळ

Maharashtra News Live Update: राहुल गांधी मांजरीत विद्यार्थ्यांच्या भेटीला येणार

Shocking: गेस्ट हाऊसच्या खोलीत ५ जणांचा संशयास्पद मृत्यू, एकाच कुटुंबातील सदस्यांसोबत नेमकं काय घडलं?

UP Accident News : महामार्गावर भीषण अपघात; डंपरमध्ये अडकून ५० मीटर फरफटत गेली कार, आई-वडिलांसह दोन मुलांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT