अमेरिकेला चक्रीवादळाचा मोठा फटका; आतापर्यंत 100 जणांचा मृत्यू Saam Tv
देश विदेश

अमेरिकेला चक्रीवादळाचा मोठा फटका; आतापर्यंत 100 जणांचा मृत्यू

अमेरिकेत काही राज्यांना चक्रीवादळाचा चांगलाच तडाखा बसला

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वृत्तसंस्था : अमेरिकेत काही राज्यांना चक्रीवादळाचा चांगलाच तडाखा बसला आहे. या चक्रीवादळामुळे (Hurricane) आतापर्यंत १०० जणांना जीव गमवावा लागला असल्याचे सांगण्यात येत आहे. चक्रीवादळाचा सर्वाधिक तडाखा केंटकी भागात बसला आहे. या ठिकाणी अनेक इमारती कोसळले (Collapsed) आहेत. हजारो लोक बेघर झाले आहेत. ताशी ३२० किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे अमेरिकेमधील (United States) ६ राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याची माहिती समोर आली आहे.

एकट्या केंटकीमध्ये ७० हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. त्यापैकी बरेच जण मेणबत्ती कारखान्यामध्ये (Candle factory) काम करत होते, तर इलिनॉय (Illinois) मधील ऍमेझॉन (Amazon) वेअरहाऊसमध्ये कमीत- कमी ६ लोक मारले गेले आहेत. ते ख्रिसमसकरिता रात्रीच्या शिफ्टमध्ये ऑर्डरची तयारी करत होते. केंटकीचे गव्हर्नर अँडी बेशियर की, “राज्याच्या इतिहासात ही सर्वात विनाशकारी तुफानी घटना आहे. आतापर्यंत ७० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. १०० पेक्षा जास्त लोक मारले गेल्याची भीती आहे.

हे देखील पहा-

मी अशी विनाशकारी घटना माझ्या आयुष्यामध्ये कधीच बघितलं नाही. मेफिल्ड शहरात मेणबत्त्या कारखान्यात छत कोसळल्याने मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली आहे. तसेच त्यांनी मध्यरात्रीपूर्वी राज्यामध्ये आणीबाणी जाहीर करण्यात आली होती,” असे बेशियर यांनी सांगितले आहे. केंटकी मधील मेणबत्ती कारखाना, इलिनॉयमधील अॅमेझॉन सुविधा आणि अर्कान्सास मधील एका नर्सिंग होमला देखील वादळाचा मोठा फटका बसला आहे.

अधिकाऱ्यांनी आतापर्यंत २९ मृत्यूंची अधिकृत पुष्टी केली होती. त्यात ३ केंटकी काउंटीमध्ये २२ जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, चक्रीवादळ जोरात आले तेव्हा मेफिल्ड कारखान्यात सुमारे ११० लोक होते, असे गव्हर्नर बेशियरनी माहिती दिली आहे. पश्चिम केंटकी मधील सुमारे १० हजार लोकसंख्येच्या मेफिल्ड शहरामध्ये नष्ट झालेल्या इमारती आणि कोसळलेल्या झाडांचा ढिगारा रस्त्यांवर पडला आहे. शनिवारी दिवसभर बचाव दलाकडून बचाव कार्य राबवण्यात आले आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात परतीच्या पावसाचा धुमाकूळ

Mumbai Port Authority: सफाई कर्मचाऱ्यांच्या घरांचा प्रकल्प रखडला; ‘मुंबई पोर्ट’कडून परवानगीसाठी विनंती

Ratnagiri Tourism : प्राचीन वास्तुकला अन् रेखी‍व शिल्पे, रत्नागिरीत गेल्यावर 'ही' लेणी पाहायला नक्की जा

Crime News: चहावाल्याच्या घरी सापडलं घबाड; १ कोटींची रक्कम अन् सोने,चांदी; दोन भावांचा कांड पाहून अधिकारीही चक्रावले

Bihar Election : ऐन निवडणुकीत काँग्रेसला मोठा धक्का; बड्या नेत्याने दिला पक्षाचा राजीनामा

SCROLL FOR NEXT