Whatsapp  Saam Tv
देश विदेश

तुमच्या शेजारी असलेला वाचू शकणार नाही तुमचे WhatsApp चॅटिंग; करा 'हा' उपाय

साम टिव्ही ब्युरो

नवी दिल्ली : व्हाट्सअॅप (Whatsapp) हे अनेक जण याचा अधिक वापर हा चॅटिंगसाठी करतात. जगभरातील लोकांकडून व्हाट्सअॅपचा वापर केला जातो. यावर तुम्ही अनेकदा वैयक्तिक चर्चा करतो. मात्र, अनेकदा सार्वजनिक ठिकाणी एखाद्या जागी बसून किंवा लोकल ट्रेनने प्रवास करताना देखील व्हाट्सअॅपवर चॅटिंगमध्ये व्यग्र असतो. यावेळी काही जण आपल्या व्हाट्सॅपमध्ये डोकावून चॅटिंग वाचत असतात. याचा अनेकांना राग येतो, मात्र यावर आता नवा पर्याय मिळाला आहे.

लोकल ट्रेन किंवा बसमधून नेहमी प्रवास करताना काही जण तुमचे व्हॉट्सअॅप चॅटिंग वाचत असतात. मात्र, ही चॅटिंग कोणी वाचू शकणार नाही, अशी सोय उबलब्ध झाली आहे. या सुविधेमध्ये तुम्ही सार्वजनिक ठिकाणी चॅटिंग करत असाताना देखील डोकावणाऱ्या व्यक्तीला तुमचं चॅटिंग वाचता येणार नाही. मात्र यासाठी तुम्हा थर्ड पार्टी अॅपची मदत घ्यावी लागणार आहे. यासाठी अँड्रॉइड वापरकर्त्यांना गुगल प्ले स्टोरवरून MaskChat-Hides Chat अॅप डाउनलोड करावा लागणार आहे. हा अॅप डाउनलोड केल्यावर तुम्ही सहजरित्या तुमची व्हाट्सअॅप चॅटिंग सार्वजनिक ठिकाणी लपवू शकता.

दरम्यान, हे अॅप त्याच्या नावानुसारच काम करतं. सदर अॅप मोफत असल्यामुळे तुम्हाला अधून-मधून जाहिराती देखील पाहाव्या लागणार आहे. MaskChat-Hides Chat हे अॅप तुमच्या मोबाइलच्या स्क्रिनवर डिजिटल पदडा टाकतो. या अॅपच्या माध्यमातून तुमच्या बाजूला बसलेल्या व्यक्तीला देखील तुमची चॅटिंग वाचता येणार नाही. त्यामुळे तुम्ही सुरक्षितरित्या चॅटिंग करू शकता. हे अॅप तुम्ही व्हाट्सअॅप व्यतिरिक्त इंस्टाग्राम (Instagram) ,फेसबुकसाठी वापरू शकतो.

असा करता येतो या अॅपचा वापर

हे अॅप तुम्ही गुगल प्ले स्टोरमधून डाउनलोड करू शकता. त्यानंतर हे अॅप ओपन करा.अॅप ओपन केल्यानंतर प्लोटिंग मास्क ऑयकॉन दिसेल. तुम्हाला चॅटिंग लपवायची असेल तर स्क्रिनवरील ऑयकॉनवर क्लिक करावे लागेल. त्यानंतर सहजरित्या चॅटिंग इतरांपासून लपवू शकता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT