Thusrday Horoscope : विजयादशमी असली तरी आयुष्यात अडचणी येणार; ५ राशींच्या लोकांच्या नशिबात संकटे

Thusrday Horoscope in Marathi : काही राशींच्या लोकांच्या आयुष्यात अडचणी येण्याची शक्यता आहे. तर काहींच्या नशिबात संकटे येण्याची शक्यता आहे.
horoscope in marathi
Sunday Horoscope In Marathi Saam tv
Published On

पंचांग

गुरुवार,२ ऑक्टोबर २०२५,अश्विन शुक्लपक्ष,विजयादशमी(दसरा),

महात्मा गांधी जयंती.

तिथी-दशमी १९|११

नक्षत्र-उत्तराषाढा

रास-मकर

योग-सुकर्मा

करण-तैतिल

दिनविशेष-शुभ दिवस

मेष - आजचा दसरा आपल्यासाठी विशेष छान फलीत घेऊन आलेला आहे. नोकरीमध्ये प्रगती बढतीचे योग आहेत. कर्मस्थान सुधारल्यामुळे आयुष्यामध्ये विशेष भरभराटीचे योग आज घडत आहेत.

वृषभ - काही दिवस असे असतात की न मागता आपल्याला देव देतो. आजचा दिवस असाच भाग्यकारक तुमच्या वाटेला आलेला आहे. दसरा हा सण सुवार्ता कानावर देईल. लक्ष्मी उपासना विशेष फलदायी ठरेल.

मिथुन - विजयादशमी असली तरी आयुष्यात अडचणी येतील. आज आपल्या नशिबात संकटे आहे यातून मार्गक्रमण करत पुढे जाल. सरकारी कामे लांबणीवर पडताना दिसत आहेत. नव्याने ओळखी होतील.

horoscope in marathi
Vastu Tips Of Camphor: घरात या ठिकाणी जाळा कापूर, वास्तुदोष होईल दूर, जाणून घ्या फायदे

कर्क - जोडीदाराच्या मागण्या मान्य करून पुढे जावे लागेल. तरच तुमचा दसरा आज हसरा होईल. नव्याने खरेदी होईल. संसारासाठी गोडी- गुलाबीने नांदण्याचा आजचा दिवस आहे.

सिंह- प्रयत्नांती परमेश्वर असा दिवस आज आहे. मेहनतीने यश पादाक्रांत कराल. कधी कधी आपल्याच लोकांकडून त्रास होतो असेही वाटेल. आज नातेवाईक मात्र तुम्हाला सांभाळून घ्यावे लागतील. दिवस संमिश्र आहे.

कन्या - जे ठरवाल ते होईलच. विशेषतः सरस्वतीची कृपा आपल्यावर राहणार आहे. सृजनशीलता वाढेल. प्रज्ञा वैभव बहरेल. विष्णू उपासना विशेष फलदायी ठरेल. पैशांची आरास होईल इतके धनयोग आज संभवत आहेत.

horoscope in marathi
Vastu Tips : पावसामुळे Work From Home करताय; ५ गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा येतील अडचणी

तूळ - कुटुंबियांच्या बरोबर आनंदात दिवस व्यतीत कराल. घरासाठी नव्याने खरेदी होईल. घर खरेदी, वाहन खरेदी गुरे- ढोरे यांबाबत आज भरभराट घेऊन आलेला दिवस आहे. दसरा निश्चितच आयुष्यामध्ये चांगला बदल घडवणार आहे.

वृश्चिक - आपल्या पराक्रमाला यशाचा मुकुट लाभेल. आजवर केलेल्या मेहनतीचे फळ आज या दसऱ्याच्या दिवशी ने दुप्पट मिळणार आहे. भावंडांचे सौख्य लाभून प्रेमाने दिवस साजरा कराल.

धनु - कितीही अधिक उणे असले तरी सुद्धा सणासुदीच्या दिवशी कुटुंबीयांना पर्याय नाही हे आज जाणवेल. धार्मिक गोष्टीत विशेष सहभाग घ्याल. वडिलोपार्जित संपत्ती आणि इतरही धनाची आवक आज चांगली राहणार आहे.

horoscope in marathi
Vastu Tips: मंदिरात या ६ वस्तू दान करा, घरात येईल सुख-समृद्धी

मकर - न बोलता गोष्टी कराल .आयोजन नियोजन चांगले राहील. दसरा या सणा बरोबरच स्वतःचा आनंद हा कुपितल्या अत्तराप्रमाणे आज तुमच्या राशीला दरवळणार आहे. आरोग्य उत्तम राहील. दिवस चांगला आहे.

कुंभ - होऊ द्या खर्च असे काहीसे आज दिसते आहे. खर्चाला धरबंद राहणार नाही. जोडीदारासाठी विशेष पैसा खर्च करावा लागेल. मोठ्या प्रवासाचे योग आहेत. दसऱ्याचा आनंद तर आज असेलच आणि म्हणून खर्चाचे दुःख वाटून घेऊ नका.

मीन - सगे ,सोयरे, सोबती, नातेवाईक, मित्र, मैत्रिणी यांबरोबर आज ऊठबस होईल. मनातील गोष्टींचे हितगुज साधाल. जुन्या गुंतवणीमधून योग्य परतावा मिळणार आहे. आज येणारा दसरा साडेतीन मुहूर्त पैकी एक नव्याने यशाची मोहर उमटवणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com