डर्टी बाबाचा डर्टी पिक्चर! चैतन्यानंद सरस्वतीच्या इन्स्टिट्यूटमध्ये सापडलं सेक्स टॉय अन् पॉर्न व्हिडिओच्या पाच सीडी

Chaitanyanand Saraswati Baba : बाबा चैतन्यानंद सरस्वती यांच्या संस्थेवर छापा टाकून पोलिसांनी एक सेक्स टॉय आणि पाच पॉर्न सीडी जप्त केल्या आहेत. इतकेच नाही तर जागतिक नेत्यासोबत बाबाचे फोटो देखील पोलिसांना मिळून आले आहेत.
Chaitanyanand Saraswati Baba
Police raid at Chaitanyanand Saraswati’s institute uncovers sex toy and five porn CDs.saam tv
Published On
Summary
  • बाबा चैतन्यानंद सरस्वतीच्या अडचणीत वाढ.

  • पोलिसांनी इन्स्टिट्यूटमध्ये झडतीदरम्यान आक्षेपार्ह साहित्य जप्त केलं.

  • सेक्स टॉय आणि पाच पॉर्न सीडी पोलिसांच्या ताब्यात.

बाबा चैतन्यानंद सरस्वतीच्या अडचणीत अजून वाढ होण्याची शक्यता आहे. लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या चैतन्यानंद सरस्वतीचा अजून एक डर्टी प्रकार समोर आलाय. पोलिसांनी बाबा चैतन्यनंद सरस्वती यांच्या इन्स्टिट्यूटची झडती घेतल्यानंतर मोठी बाब उघडकीस आलीय.

Chaitanyanand Saraswati Baba
Bihar Election : निवडणकीआधीच मुख्यमंत्र्यांना मोठा धक्का; फायरब्रँड नेता पक्षाला रामराम ठोकणार

पोलिसांना झडतीदरम्यान आक्षेपार्ह साहित्य जप्त करण्यात आले. आज तपासादरम्यान पोलिसांचे एक पथक बाबांसोबत इन्स्टिट्यूटमध्ये गेले. पोलिसांनी संस्थेच्या परिसरात दुसऱ्यांदा झडती घेतली. या छाप्यादरम्यान पोलिसांना अनेक आपत्तीजनक वस्तू सापडल्या. यात एक सेक्स टॉय, अश्लील व्हिडिओ असलेल्या पाच सीडी सापडल्या आहेत.

Chaitanyanand Saraswati Baba
Crime News : रक्षकच भक्षक! आईच्या डोळ्यासमोर मुलीवर बलात्कार, २ पोलिसांचा काळा कारनामा, राज्यात खळबळ

त्याचबरोबर जागतिक नेत्यांसोबतचे त्यांचे बनावट फोटोदेखील मिळून आले. बाबा चैतन्यानंद सरस्वती यांचा अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्यासोबत फोटो आहे. तसेच युकेचे माजी पंतप्रधान डेविड कॅमरून यांच्यासोबतचाही फोटो पोलिसांना मिळून आलाय. लैगिंक शोषणाचा प्रकार उघडकीस आल्यानंतर बाबा फरार झाला होता.

चैतन्यानंद सरस्वती बागेश्वर आणि अल्मोडाला गेला होता. तेथेच पोलिसांनी त्याला अटक केली होती. दरम्यान पोलिसांनी बाबा चैतन्यानंद सरस्वतीचे अनेक एअर होस्टेससोबतचे फोटो आणि चॅटिंग जप्त केल्या आहेत. याआधीही बाबाबद्दल आणखी धक्कादायक खुलासे झालेत.

बाबाच्या मोबाईल फोनमधून अनेक मुलींसोबत केलेली चॅटिंग उघडकीस आली. यात बाबा मुलींना काहीतरी आमिष देऊन मुलींना फसवत असल्याचं तपासात समोर आलंय. यासह बाबाचे एअर होस्टेटसह फोटोदेखील समोर आलेत. तसेच काही मुलींचे प्रोफाईल फोटोही बाबाने आपल्या मोबाईलमध्ये स्क्रीनशॉटच्या माध्यमातून सेव्ह केले होते.

बाबाचे अनेक मुलींसोबतच्या अश्लील चॅट्स देखील पोलिसांनी जप्त केले आहेत, ज्यामध्ये तो थेट सेक्सबद्दल चर्चा करताना दिसतो. शिवाय, इतर असंख्य डिलीट केलेल्या चॅट्स परत मिळवण्याचा प्रयत्न केला जात आहे. यापूर्वी बाबा चैतन्यानंद सरस्वती पोलिसांच्या चौकशीदरम्यान उडावाउडवीची उत्तरे देत होता. जेव्हा पोलिसांनी त्याला आपला खाकीचा रुबाब दाखवला तेव्हा बाबानं चौकशीला स्पष्ट उत्तरं दिलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com