ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
कपल्ससाठी पिलो टॉक हा एक ट्रेंड बनत आहे. अनेक जोडपी ते फॉलो करत आहेत. पण पिलो टॉक म्हणजे काय, जाणून घ्या.
पिलो टॉक म्हणजे उशीवर झोपून बोलणे. जोडप्यांनी झोपण्यापूर्वी एकमेकांशी संवाद साधला पाहिजे.
पिलो टॉकमुळे नवरा बायकोला एकमेकांचे दैनंदिन दिनचर्या आणि इतर गोष्टी ऐकण्यास आणि समजून घेण्यास मदत होते. यामुळे त्यांना आयुष्यात काय चालले आहे याबद्दल माहिती मिळते.
नवरा बायकोला काही भावनिक विषयांवर सामान्यपणे चर्चा करता येत नाही. पिलो टॉकमुळे भावनिक नाते आणि संबंध अधिक दृढ होण्यास मदत होऊ शकते.
पिलो टॉकमुळे नवरा बायकोच्या नात्यात प्रेम वाढते.
जोडपे बहुतेकदा कामावर असतात, त्यामुळे त्यांना दिवसभर बोलण्यासाठी वेळ नसतो. पिलो टॉक हा त्यांचा मी-टाइम किंवा वैयक्तिक गोष्टी शेअर करण्यासाठी बेस्ट आहे.
पिलो टॉकमुळे जोडप्यांमध्ये विश्वास निर्माण होऊ शकतो. बऱ्याचदा, कपल्स त्यांच्या जोडीदारापेक्षा जास्त वेळ मोबाईल फोनवर घालवतात. म्हणून पिलो टॉक केल्याने नात्यामध्ये विश्वास वाढतो.