ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
पोहे, शेंगदाणे, कढीपत्ता, मोहरी, हळद, मीठ, साखर आणि तेल.
सर्वप्रथम पोहे भाजून घ्या. तसेच शेंगदाणेही भाजून घ्या.
तेल गरम करुन यामध्ये मोहरी, कढीपत्ता, हळद आणि मीठ घाला.
तेलामध्ये भाजलेले पोहे, शेंगदाणे मिक्स करा. तसेच, तुमच्या आवडीनुसार यामध्ये ड्राय फ्रुट्स मिक्स करा.
यानंतर, यामध्ये थोडी साखर घाला आणि सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करा.
चटपटीत आणि कुरकुरीत पोहे चिवडा तयार आहे. सकाळी किंवा संध्याकाळच्या नाश्त्यासाठी चहासोब चिवड्याचा आनंद घ्या.
पोहा कुरकुरीत ठेवण्यासाठी चिवडा हवाबंद डब्यात ठेवा.