ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
जर तुम्हाला तुमच्या आहारात फायबर वाढवायचे असेल तर तुम्ही फळे, भाज्या, डाळी तसेच धान्यांचा समावेश केला पाहिजे.
नाचणी आणि ओट्स हे दोन्हीही फायबरयुक्त पदार्थ आहेत. जे वजन कमी करण्यासाठी फायदेशीर मानले जाते.
नाश्त्यामध्ये नाचणी की ओट्स काय खाल्ल्याने वजन कमी करण्यास मदत होते, जाणून घ्या.
नाचणी हे एक पौष्टिक, ग्लूटेन-फ्री धान्य आहे जे फायबरने समृद्ध आहे आणि याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी आहे.
नाचणी खाल्ल्याने तुम्हाला जास्त काळ पोट भरलेले राहण्यास मदत होते, ज्यामुळे वारंवार जास्त खाणे टाळता येते. नाश्त्यासाठी नाचणीची भाकरी, दलिया किंवा पॅनकेक्स बनवू शकता.
ओट्स हे वजन कमी करण्यासाठी फायदेशीर मानले जाते. यामध्ये बीटा-ग्लुकन, सॉल्यूबल फायबर असतो. यामुळे पचनक्रिया मंदावते आणि पोट जास्त वेळ भरलेले राहते. तसेच कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते.
वजन कमी करण्यासाठी दोन्हीही फायदेशीर आहे. सॉल्यूबल फायबरमुळे ओट्स पोटाची चरबी कमी करण्यास अधिक मदत करतात आणि एकूण वजन नियंत्रित ठेवण्यासाठी नाचणी फायदेशीर आहे.