मोबाईल फोन आपली गरज बनलाय. मोबाईलशिवाय आपली दैनंदिन कामंही होऊ शकत नाही ही आता काळ्या दगडावरची रेघ आहे. मोबाईल जसा फायदेशीर आहे तितकाच तो त्रासदायक देखील आहे. कारण अलिकडे स्पॅम कॉल्सचं प्रमाण इतकं वाढलंय की सारेच मोबाईल ग्राहक त्याला वैतागले आहेत. बोगस कॉल्सद्वारे ऑनलाईन गंडा घालणाऱ्या महाठगांची संख्याही कमी नाही.
कंपन्यांचं मार्केटिंग, फसवणूक यामुळे अनेकजण अननोन नंबरला प्रतिसादच देत नाहीत. मात्र या सगळ्यावर टेलिकॉम विभागाने कडक पावलं उचलल्या दावा सोशल मीडियात केला जातोय. अशा मार्केटिंग कंपन्यांसाठी स्वतंत्र नंबरची सीरिज सुरू होणार असल्याचा मेसेज व्हायरल होतोय. या मेसेजमध्ये नेमकं काय म्हंटलंय पाहा..
टेलकॉम विभागानं 160 सीरिजपासून नंबर सुरू करण्याची घोषणा केलीय. सेवा पुरवणाऱ्या सर्व कंपन्या आणि ट्रान्साक्शनशी संबंधित सर्व कॉल्स आता याच नंबरने येतील. सध्या 140 सीरिजपासून सुरू होणाऱ्या नंबरचा दुरूपयोग सुरू आहे. शिवाय फसवणुकीचं प्रमाणही वाढलंय. त्यामुळेच ही नवी सीरिज सुरू केली जाणार आहे.
व्हायरल मेसेज वाचून मोबाईल ग्राहकांना निश्चितच सुटकेचा निश्वास टाकलाय. मात्र खरंच अशी सीरिज सुरू होतीय का? की व्हॉट्सऍप युनिव्हर्सिटीवर कुणीतरी हा खोडसाळपणा केलाय? यावरून मोबाईलधारक संभ्रमात आहेत. साम टीव्हीनं या मेसेजची पडताळणी केली. आमच्या प्रतिनिधींनी टेलिक़ॉमशी निगडीत तज्ज्ञांची चर्चा केली. तेव्हा त्यांनी काय सांगितलं पाहा.
सेवा पुरवणाऱ्या कंपन्या तसच ट्रान्सॅक्शन कॉलसाठी ग्राहकांना देण्यात आलेल्या 10 अंकी क्रमांकाचा वापर केला जात आहे. त्यामुळे फसवणुकीचं प्रमाण वाढलंय. अनेक कंपन्या याच नंबरचा वापर प्रमोशनसाठी करत असून त्यामुळे ग्राहक त्रासले आहे. या सगळ्यावर उपाय म्हणून टेलिकॉम विभागाने 160 नंबरची सीरिज सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांसाठी हा नंबर असेल तर आरबीआई, सेबी, पीएफआरडीए, आयआरडीए अशा वित्तीय संस्थामार्फत दिल्या जाणाऱ्या सेवेच्या नंबरची सुरूवात 1601 पासून असेल. तरीही ग्राहकांना बोगस कॉल्स येत असतील किंवा त्यांची फसवणूक होत असेल तर त्यांनी तत्काळ www.sancharsaathi.gov.in (संचारसाथी) या साईटवर तक्रार करा.
आमच्या पडताळणीत बोगस कॉल्सपासून तुमची फसवणूक टाळण्यासाठी लवकरच 160 नंबरची सीरिज सुरू होत असल्याचा दावा सत्य ठरलाय. तुम्ही याबाबत इतरांनाही जागृक करा. आपली तसच आपल्या सहकाऱ्यांची, कुटुंबियांची होणारी फसवणूक टाळा.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.