VIDEO : खासदार प्रणिती शिंदे आणि आमदार कल्याणशेट्टी यांच्यात वाकयुद्ध | Marathi News
सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी त्यांचे अक्कलकोटचे उमेदवार सिद्धाराम म्हेत्रे यांच्या प्रचारादरम्यान भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. "भाजपच्या त्रासाला आणि त्यांच्या आमदाराला तुम्ही वैतागला आहात, हे आमदार फक्त जीआरवर आहेत. बाकी अस्तित्वात काही दिसत नाही. बाराशे - तेराशे कोटींचा निधी हा फक्त कागदावर आहे. मागच्या 5 वर्षात अक्कलकोट तालुक्यात कांहीच विकासकामे झालेली नाहीयेत. त्यामुळे भाजपकडे माणुसकी आणि संस्कृती नाहीये. एकीकडे महिलांवर बलात्कार करतात, चार वर्षांच्या लहान मुलीला पण सोडत नाहीत आणि दुसरीकडे लाडक्या बहिणीच्या नावाने महिलांना आमिष दाखवून मत विकत घेण्याचं काम भाजप करत आहे. त्यामुळे त्यांना कधीच माफी नाहीये. भाजपने साम, दाम, दंड, इडी, सिबीआय वापरल तरी विजय हा काँग्रेस आणि लोकशाहीचा होणार आहे. आता कोणीही किंगमेकर नसून जनताजनार्दन किंगमेकर ठरणार आहे."असं प्रणिती शिंदेंनी म्हंटलं आहे.
दरम्यान, खासदार प्रणिती शिंदे यांच्या टिकेला भाजपचे अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी देखील जोरदार प्रतिउत्तर दिल आहे. "खासदार शिंदे यांनी मुंबई सोडून एकदा अक्कलकोटमध्ये यावं. अक्कलकोटमध्ये किती काम झाले हे बघण्यासाठी मी स्वतः त्यांना घेऊन फिरतो. विधानसभा निवडणुकीत त्यांनी काहीतरी भाषण करायचं म्हणून केल असेल. मात्र काँग्रेसच मूळ दुखणं ही 'लाडकी बहीण' आहे. खासदार शिंदे यांच्याकडून फेक नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला जात आहे. विकासाचं नवीन परफेक्शन भाजपकडून सेट करण्यात आल आहे. सध्या दक्षिण सोलापूर आणि पंढरपूर विधानसभा मतदारसंघात ताळमेळ नसलेली आघाडी दिसून येत आहे. त्यामुळे निवडणुकीनंतर महायुतीचं सरकार येणार आहे.
Edited By Rakhi Rajput
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.