Tax Return
Tax Return  Saam Tv
देश विदेश

Income Tax Return : आयटीआर भरण्यासाठी आयकर विभागाचे पोर्टल झाले सुरू; 'ही' आहे शेवटची तारीख

साम टिव्ही ब्युरो

नवी दिल्ली : मूल्यांकन वर्ष २०२२-२३ करदात्यांना ई-फायलिंग पोर्टलवर आता इनकम टॅक्स रिटर्न (ITR) दाखल करता येऊ शकतो. आयकर विभागाच्या ट्विट करून करदात्यांना आयटीआर भरण्याची विनंती केली आहे. वित्तीय वर्ष २०२१-२२ मध्ये देशातील सामान्य व्यक्तींना कर भरण्याची शेवटची तारीख ३१ जुलै २०२२ असणार आहे. ज्या व्यवसायांना ऑडिटची (Audit) आवश्यकता आहे, त्यांच्यासाठी शेवटची तारीख ही ३१ ऑक्टोबर २०२२ असणार आहे. तसेच ज्या करदात्याने विदेशात किंवा घरगुती ट्रांजेक्शन केले असेल, तर ३० नोव्हेंबर २०२२ ही शेवटची तारीख असेल. ( How to fill income tax retrun file In marathi )

या वर्षी फायलिंग पद्धतीमध्ये खूप बदल झाले आहे. त्यामुले आयकर विभाग करदात्यांना विचारू इच्छित आहे की, गेल्या वर्षी कर पद्धतीनुसार तुम्ही कर देऊ इच्छिता की यात तुम्ही बदल करू इच्छित आहे. ई-फायलिंग पोर्टलवर आरटीआर भरण्यासाठी पॅन कार्ड, आधार कार्ड (Adhar Card) , फॉर्म १६, बँक (Bank) खात्याची माहिती आणि अन्य उत्पन्नाचा पुरावा असणे गरजेचे आहे. आरटीआर फाइल दाखल करण्यासाठी पॅन कार्ड (Pan Card) हे आधार कार्डसोबत लिंक असणे गरजेचे आहे. तसेच तुमचा ईमेल आयडी देखील आयकर विभागाजवळ नोंदणीकृत असला आहे.

अशी फाइल करा 'आयटीआर फाइल'

१) सर्वात आधी आयकर विभागाच्या वेबसाईटला भेट द्या.

२)पॅन कार्ड, पासवर्ड आणि कॅप्चा कोड टाईप करून लॉगइन करा.

३) त्यानंतर ई-फाइल मेन्यूवर जाऊन इनकम टॅक्क रिटर्न लिंकवर क्लिक करा .

४) तु्म्ही इनकम टॅक्स रिटर्नच्या पेजवर गेल्यावर तुमच्या पॅन कार्डची नोंदणी होईल. त्यानंतर पॅनकार्ड आयटीआरवर डेटाबेससोबत लिंक होईल. पुढे FILE NOW वर क्लिक करा.

५) त्यानंतर मूल्यांकण वर्षावर क्लिक करा. तिथे तुम्हा २०२२-२३ हे वर्ष निवडा.

६) आता ऑनलाइन मोड ऑफ फिलिंगवर क्लिक करा.

७) इथे तुम्हा स्टेटस विचारले जाईल.तेव्हा वैयक्तिक, एचयूएफ किंवा अन्य असून तुमच्या अनुसार पर्याय निवडा.

८) त्यानंतर आयटीआर फॉर्म निवडा.

९) तु्मचं उत्पन्न हे ५० लाखांहून अधिक असेल तर आयटीआर १ वर क्लिक करा. जर तुमचं उत्पन्नाचा मार्ग वेतन, प्रॉपर्टी, व्याज किंवा शेतीतून पाच हजारापर्यंत उत्पन्न असेल तर निवडू शकता.

१०) तु्म्ही वैयक्तिक, एचयूएफ आणि फर्मच्या व्यतिरिक्त तुमचे उत्पन्न ५० लाखांहून अधिक असेल तर इनकम सेक्शन 44AD, 44ADA किंवा 44AE हे तुमच्या अनुसार निवडू शकता. तसेच तुम्हाला आयटीआर ४ वर क्लिक करावे लागेल.

११) समजा तुम्ही आयटीआर १ वर क्लिक केलं असेल.

१२) त्यानंतर तु्म्ही Lets get started वर क्लिक करा.

१३) रिटर्न फाइल करण्यासाठीचा पर्यायावर क्लिक करा.

१४) तुम्ही आधी दिलेली माहिती तपासून घ्या.

१५) तुम्ही काही कॉलम्समध्ये नवे कागदपत्रे अपलोड करू शकता.

१६) त्यानंतर मागितलेली माहिती भरून कन्फर्मवर क्लिक करा.

१७) कन्फर्म झाल्यावर व्हेरीफाय आणि सबमिट पर्यायावर क्लिक करा.

१८) Taxes Paid And verification टॅबवर उपयुक्त व्हेरीफिकेशन पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर तुम्ही त्वरित ई-व्हेरीफाय करू शकता.

१९) ई-फायलिंग पोर्टलवर हे सर्व केल्यानंतर ड्राफ्टवर क्लिक करू शकता. असं करणं गरजेचं आहे, कारण न केल्यास तुमची माहिती डिलेट होऊ शकते.

२०) आयटीआर वेबसाईटवर ड्राफ्ट सेव्ह केल्यानंतर ३० दिवसांपर्यंत किंवा आयटीआर फाइल करेपर्यंत सेव्ह करू शकता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Custard Apple Benefits : डोळ्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी सीताफळ उपयुक्त; जाणून घ्या आरोग्यदायी फायदे

Special Report : बारामतीत मडकं फोडणारा "तो" कार्यकर्ता कोण?

Special Report : तुम्हारे पास क्या है? कोल्हेंच्या डायलॉगबाजीने अहमदनगरात वातावरण तापलं

Mithila Palkar : ‘वेब क्वीन’ मिथिलाचा अनोखा साज, लूकने वेधले लक्ष

Nashik Lok Sabha: शांतीगिरी महाराज निवडणूक लढण्यावर ठाम, नाशिकमध्ये महायुतीला घाम! गोडसेंच्या अडचणी वाढणार?

SCROLL FOR NEXT