Delhi Development Authority new housing scheme registration process : राजधानी दिल्लीमध्ये घर घेण्याचा विचार करत असाल तर आनंदाची बातमी आहे. मकरसंक्रातीच्या निमित्ताने दिल्लीमध्ये गृहनिर्माण सुरू करण्यात आली आहे. महत्त्वाकांक्षी योजनेद्वारे फक्त १० लाखांत हक्काचे घर मिळणार आहे. दिल्ली विकास प्राधिकरणाने (DDA) मकरसंक्रांतीच्या निमित्ताने प्रीमियम गृहनिर्माण योजना सुरू केली. या महत्वाकांक्षी योजनेअंतर्गत दिल्लीतील प्रमुख ठिकाणी ५८२ मालमत्ता ई-लिलावाद्वारे विक्रीसाठी उपलब्ध झाल्या आहेत.
उच्च उत्पन्न गटापासून (एचआयजी) आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या (ईडब्ल्यूएस/जनता) लोकांना घर मिळावे, हा डीडीए उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. सर्वांना आपल्या बजेटनुसार आणि पसंतीचे घर राजधानीत या योजनेमुळे मिळणार आहे. योजनेअंतर्गत सर्वसामान्यांना हक्काचे घर मिळणार आहे, याची किंमत खिशाला परवडणारी आहे.
उच्च उत्पन्न गटासाठी (HIG) जसोला सारख्या पॉश भागात १५ घरे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. या घराची किंमत ₹२.१४ कोटींपासून सुरू आहे. वसंत कुंज, द्वारका आणि रोहिणी यासारख्या भागात SFS फ्लॅट्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत, त्याची किंमत ₹९९ लाख ते ₹१.२१ कोटींपर्यंत आहे. मध्यम उत्पन्न गटासाठी (MIG) दिलशाद गार्डन आणि जहांगीरपुरी या भागात ₹५३ लाख ते ₹१.४५ कोटींपर्यंत पर्याय उपलब्ध आहेत. तर विकासपुरी आणि पश्चिम विहार सारख्या भागात ₹२४ लाख ते ₹१.२३ कोटींपर्यंत LIG फ्लॅट्स उपलब्ध आहेत. तर जनता आणि EHS श्रेणींमध्ये परवडणाऱ्या फ्लॅट्सची किंमत ₹१० लाख ते ₹५५ लाखांपर्यंत आहे.
दिल्ली विकास प्राधिकरणाने विक्रीसाठी फक्त घरेच उपलब्ध केली नाहीत, तर पार्किंगवरही लक्ष दिले आहे. कार आणि स्कूटरसाठी खास पार्किंग देण्यात आले आहे. अशोक विहार, मॉल रोड, रोहिणी आणि पितमपुरा या गर्दीच्या भागात पार्किंग जागा शोधणारे लोक या गॅरेजसाठी बोली लावू शकतात. या पार्किंगची किंमत ₹३ लाख ते ₹१५ लाख आहे.
ई-लिलावात सहभागी होण्यासाठी अर्जदारांना ₹२,५०० चे नोंदणी शुल्क भरावे लागेल. त्यानंतर त्यांना फ्लॅट श्रेणीनुसार ठराविक रक्कम (EMD) जमा करावी लागेल. उच्चवर्गासाठी कमीत कमी ₹१५ लाख, MIG/SFS साठी ₹१० लाख आणि LIG/जनता फ्लॅटसाठी ₹२ लाख रक्कम ठरवण्यात आली आहे. कार पार्किंग गॅरेजसाठी ₹१ लाख आणि स्कूटर गॅरेजसाठी ₹५०,००० चे EMD भरावेच लागेल. अर्ज आणि EMD सादर करण्याची प्रक्रिया १४ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११:०० वाजता सुरू झाली आहे. अर्ज करण्याची शवेटची तारखी १३ फेब्रुवारी ठेवण्यात आली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.