Ayodhya Ram Mandir Inauguration Saam Digital
देश विदेश

Ayodhya Ram Mandir: अयोध्येत राम मंदिर बांधण्यासाठी आतापर्यंत किती आला खर्च? श्रीरामाच्या जुन्या मूर्तीचे काय होणार?

Satish Kengar

Ram Mandir Construction Cost:

अयोध्येत प्रभू श्रीरामाचे भव्य राम मंदिर तयार होत आहे. श्रीराम यांचा अभिषेक सोहळा उद्या म्हणजेच सोमवारी होणार आहे. दरम्यान, श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे खजिनदार गोविंद देव गिरी यांनी सांगितले की, तात्पुरत्या मंदिरात ठेवण्यात आलेली श्रीरामाची जुनी मूर्ती नवीन मूर्तीसमोर ठेवण्यात येणार असून, 22 जानेवारी रोजी येथील मंदिरात अभिषेक करण्यात येणार आहे.

राम मंदिराच्या उभारणीसाठी आतापर्यंत 1,100 कोटी रुपयांहून अधिक खर्च झाला असून, बांधकाम पूर्ण न झाल्याने आणखी 300 कोटी रुपयांची गरज भासू शकते, असेही ते म्हणाले.  (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

गेल्या आठवड्यात राम मंदिराच्या गर्भगृहात श्रीरामाची 51 इंची मूर्ती ठेवण्यात आली होती. श्रीरामाच्या तीन मूर्ती बनवण्यात आल्या, त्यापैकी म्हैसूरचे शिल्पकार अरुण योगीराज यांनी तयार केलेल्या मूर्तीची अभिषेकासाठी निवड करण्यात आली आहे. इतर दोन मूर्तींचे काय होणार, असे विचारले असता श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे खजिनदार गोविंद देव गिरी म्हणाले, "आम्ही त्या पूर्ण आदराने आणि सन्मानाने मंदिरात ठेवू. एक मूर्ती आमच्याकडे भगवान श्रींची वस्त्रे आणि दागिने मापण्यासाठी म्हणून ठेवली जाईल.''  (Latest Marathi News)

ते म्हणाले, मूळ मूर्ती अत्यंत महत्त्वाची आहे. तिची उंची पाच ते सहा इंच असून ती 25 ते 30 फूट अंतरावरून भाविकांना दिसणार नाही म्हणून एका मथ्या मूर्तीची गरज होती.

गिरी म्हणाले, "(मंदिराचा) एक मजला पूर्ण झाला आहे आणि दुसऱ्या मजल्याचे काम सुरू आहे." अरुण योगीराज यांनी बनवलेल्या श्रीरामाच्या मूर्तीच्या निवडीबद्दल गिरी म्हणाले, "आमच्यासाठी तीन मधून एक मूर्तीची निवड करणं खूप अवघड होतं. त्या सर्व अतिशय सुंदर आहेत, सर्व मुर्त्या आम्ही दिलेल्या निकषांचे पालन करून बनवण्यात आल्या आहेत."

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalna Accident: जालन्यात बस- ट्रकचा भीषण अपघात! ५ ते ६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती

iPhone 16 चा सेल सुरू, 67500 रुपयांपर्यंतची ऑफर; किंमत, ऑफर आणि खरेदीचे ठिकाण वाचा सर्वकाही

Maharashtra News Live Updates: मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, उपचार घेण्यास नकार

Sambhajinagar Corporation : पाणी पुरवठ्यासाठी करणार सौरऊर्जेचा वापर; शंभर एकर जागेवर संभाजीनगर महापालिका उभारणार प्रकल्प

Maggi Dosa Recipe : मुलांना टिफीनमध्ये द्या झटपट बनवलेला मॅगी डोसा; वाचा 5 मिनिटांत तयार होणारी रेसिपी

SCROLL FOR NEXT