नवी दिल्ली - हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कोर्पोरेशन लिमिटेड बैठकीत हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कोर्पोरेशन लिमिटेड हे एचडीएफसी बँकेत विलीन होणार आहे. या विलीनीकरणाला HDFC च्या बोर्डाने मान्यता दिली आहे. त्यामुळे आता एचडीएफसी बँक 100 टक्के सार्वजनिक भागधारकांच्या मालकीची असणार आहे. या घोषणेनंतर शेअर बाजारात एचडीएफसी बँक आणि एचडीएफसी या दोन्ही कपन्यांच्या शेअरमध्ये मोठी उसळी दिसून आली.
विलीनीकरणाचे प्रमाण काय आहे
या विलीनीकरणाअंतर्गत, HDFC बँकेने HDFC LTD चा 41 टक्के हिस्सा घेण्याचा निर्णय घेतला आहे. एचडीएफसी बँकेने स्टॉक एक्सचेंजला दिलेल्या माहितीत ही माहिती दिली आहे.
HDFC-HDFC बँकेचे विलीनीकरण केव्हा पूर्ण होईल?
HDFC बँक आणि HDFC यांचे विलीनीकरण आर्थिक वर्ष 2024 च्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या तिमाहीत होऊ शकते. आज मुंबईत सकाळी 11.30 वाजता HDFC आणि HDFC बँकेच्या विलीनीकरणाची घोषणा करण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
एचडीएफसी आणि एचडीएफसी बँकेच्या शेअर्समध्ये मोठी वाढ झाली आहे. सेन्सेक्स 60 हजाराच्या पलिकडे केला आहे. तर निफ्टीचीही 18 हजाराच्या दिशेने घोडदौड आहे. तसेच बँक निफ्टीमध्येही 900 अंकांची उसळी पाहायला मिळत आहे. एचडीएफसीच्या या प्रस्तावित व्यवहारामुळे एचडीएफसी बँकेला त्याचा गृह कर्ज पोर्टफोलिओ तयार करता येईल आणि सध्याच्या ग्राहकांना याचा फायदा होईल असा विश्वास एचडीएफसीनं व्यक्त केला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.