Bengaluru Dentist Woman Threw her Daughter From 4th Floor  SAAM TV
देश विदेश

आई म्हणावं का राक्षसीण? डॉक्टर महिलेने पोटच्या ४ वर्षीय मुलीला चौथ्या मजल्यावरून फेकलं

बेंगळुरूत काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली आहे. डॉक्टर महिलेने आपल्या पोटच्या चार वर्षीय मुलीला इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून खाली फेकलं.

Nandkumar Joshi

Dentist Woman Threw 4 year old Daughter Off 4th Floor | बेंगळुरू: बेंगळुरूत काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली आहे. डॉक्टर महिलेने आपल्या पोटच्या चार वर्षीय मुलीला इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून खाली फेकलं. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहेत.

या धक्कादायक घटनेचा व्हिडिओ (Video Viral) सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आपल्या चार वर्षांच्या मुलीला पेशाने डॉक्टर असलेल्या महिलेने चौथ्या मजल्यावरून खाली फेकले. मुलीला खाली फेकल्यानंतर ही महिला स्वतःही बाल्कनीतील रेलिंगवर उभी राहिली. पण हे वेळीच कुटुंबीयांच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने धाव घेतली. त्यानंतर तिला पकडले आणि खाली उतरवले. (Crime News)

चौथ्या मजल्यावरून मुलीला खाली फेकल्याने तिचा जागीच मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली. उत्तर बेंगळुरूच्या (Bengaluru) एसआर नगरमध्ये गुरुवारी ही मन सुन्न करणारी घटना घडली आहे.

पोलिसांनी (Police) दिलेल्या माहितीनुसार, चार वर्षांची मुलगी मूकबधिर होती. त्यामुळे डॉक्टर महिलेला नैराश्य आले होते, अशी प्राथमिक महिती समोर आली आहे. या प्रकरणी मुलीच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर, आरोपी महिलेला अटक करण्यात आली आहे.

मुलीची आई ही डेन्टिस्ट आहे. तर वडील हे सॉफ्टवेअर इंजिनीअर आहेत. पोलिसांनी सांगितले की, महिलेचे मानसिक आरोग्य आणि इतरही बाजूने तपास करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: सांगोल्यातील अपक्ष उमेदवारावर पाठिंब्यासाठी दबाव; निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे तक्रार

Pune Crime : कपड्याच्या दुकानातून पावणे चार लाखांची रोकड लंपास; चोरटे सीसीटीव्हीत कैद

Women Qualities: महिलांच्या या सवयीचं पुरूषांकडून होतं कौतुक, जिंकतात हृदय

Parenting Tips: मुलांना शिस्त लावायची आहे? मग पालकांनी ही चूक कधीच करु नका अन्यथा...

Maharashtra Election : मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात दोन्ही सेनेचे शिवसैनिक आमनेसामने; पुढे नेमकं काय घडलं? वाचा

SCROLL FOR NEXT