Yavatmal : धक्कादायक ! शेती विकून मिळणाऱ्या पैशांसाठी बाप-लेकीमध्ये झाली हाणामारी

वडील आजारातून बरे झाल्यानंतर त्यांनी घेतलेले पैसे मुलीला देण्यास नकार दिला. वडिलाने पैसे देण्यास नकार दिल्याने बाप-लेकीत बेदम मारहाण झाल्याची घटना घडली आहे.
yavatmal news
yavatmal news saam tv

संजय राठोड

Yavatmal News : मुलीने वडिलांना आजारावर उपचार करणयासाठी एक लाख रुपये कर्ज काढून दिले. मात्र, वडील आजारातून बरे झाल्यानंतर त्यांनी घेतलेले पैसे मुलीला देण्यास नकार दिला. वडिलाने पैसे देण्यास नकार दिल्याने बाप-लेकीत बेदम मारहाण झाल्याची घटना घडली आहे. सदर घटना यवतमाळच्या (Yavatmal) आर्णी तहसीलमध्ये उघडकीस आली आहे.

yavatmal news
Enforcement Directorate : अविनाश भोसले आणि संजय छाब्रिया यांच्या ४१५ कोटींच्या मालमत्तेवर ईडीची टाच

मिळालेल्या माहितीनुसार, वडील आजारी असल्याचे बघून विधवा मुलीने तिच्या वडिलासाठी बचटगाटातून एक लाख रुपये कर्ज काढून आजारावर खर्च करून ठणठणीत केले. मात्र, वडिलांनी मुलीला पैसे दिले नव्हते. मात्र, साडे चार एकर शेती विकत असल्याची माहिती मुलीला मिळाली. त्यामुळे मुलगी वडिलांवर खर्च केलेले पैसे परत घेण्यासाठी यवतमाळच्या तहसील कार्यालयात पोहोचली. मात्र, वडिलाने पैसे देण्यास नकार दिल्याने बाप-लेकीत बेदम मारहाण झाली. यवतमाळच्या आर्णी तहसीलमघ्ये ही घटना उघडकीस आली आहे.

yavatmal news
Dhule Corporation: पाणी प्रश्नावरून लोकप्रतिनिधी, नागरिकांची गांधीगिरी

दरम्यान, या विधवा महिलेला तीन अपत्य आहेत. त्या मोलमजुरी करून मुलांना जगवते.वडील आाजारी असल्याची माहिती मिळाली, तेव्हा त्यांनी बचटगटातून एक लाख रुपये कर्ज काढले. त्यानंतर वडील आजारातून ठणठणीत झाले. वडिलांच्या मालकीची यवतमाळच्या आर्णी तालुक्यात यरमल हेटी येथे साडे चार एकर शेती आहेत. ही शेती विकण्यासाठी वडील आणि त्यांचे नातेवाईक आर्णी तहसील येथे आले. याची माहिती मुलीला मिळाली, त्याही आर्णी तहसीलमध्ये पोहोचल्या. शेती विकल्यानंतर माझे एक लाख रुपये परत करा, अशी मागणी त्यांनी वडिलांकडे केली. मात्र, या दोघात मोठा वाद झाला. त्या वादाचे रुपांतर बेदम मारहाणीत झाले. यावेळी विधवा मुलीला बेदम मारहाण करण्यात आली असून तिच्या गळ्यातील सोन्याची पोत मारहाणीवेळी हरविल्याची माहिती विधवा महिलेने साम टिव्हीशी बोलताना दिली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com